spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

Champions Trophy 2025 चा तिढा १ डिसेंबरपूर्वीच का सोडवण्यात आला

चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिढा आता सुटला आहे. पाकिस्तानने आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रिड मॉडेल मान्य केले आहे. पण हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिढा १ डिसेंबरपूर्वीच का सोडवण्यात आला, याचे एक मोठे कारण आहे. आयसीसीच्या बैठकीनंतर हे कारण आता समोर आले आहे.

पाकिस्तानमध्ये काहीही करून ऐकायला नव्हते आणि आक्रमकपणे सांगत होते की, भारताने आमच्याच देशात खेळायला यावे. पाकिस्तानने ही बाजू एवढी लावून धरली होती की, एकवेळा यजमानद जाईल पण पाकिस्तान आपल्या मुद्दयांवर ठाम राहील, असे म्हटले जात होते. पण अखेर ३० नोव्हेंबरला आयसीसीने एक बैठक बोलावली आणि या बैठकीत हा तिढा सोडवण्यात आला. पण काहीही करून १ डिसेंबरपूर्वी हा तिढा सोडवण्याचे ठरवले होते आणि त्यामध्ये आता यश आले आहे.

आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये १ डिसेंबर ही तारीख महत्वाची आहे. कारण येत्या काही वर्षांसाठी ही तारीख सर्वात महत्वाची ठरणार आहे. कारण आता १ डिसेंबरला जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार आहे. जय शाह जे आयसीसी अध्यक्ष होणार हे काही दिवसांपूर्वीच ठरले होते. पण अधिकृतपणे ते आयसीसीच्या अध्यक्षपदाचा भार हा १ डिसेंबरपासून म्हणजे आजपासून हाती घेणार आहेत. जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदावर १ डिसेंबर रोजी विराजमान झाले असते तर त्यांनी पाकिस्तानबाबत निर्णय घेतला असता, तर काही जणांनी जय शाह हे पक्षपात केल्याचा आरोप केला असता आणि आयसीसीच्या अध्यक्षपदाला बट्टा लावला असता. कारण यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचा जो तिढा होता. तो भारत आणि पाकिस्तान यांच्यात होता. जय शाह हे भारताचे आहेत त्यामुळे त्यांनी पाकिस्तानविरोधात निर्णय घेतला, असे म्हटले गेले असते. त्यामुळे जय शाह यांनी आयसीसीचा पदभार स्विकारण्यापूर्वीच आयसीसीने हा निर्णय घेतल्यामुळे कोणीही आता पक्षपाताचा आरोप करणार नाही.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना फोन करून केली प्रकृतीची विचारणा..

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, १४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss