२९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा (National Sports Day २०२३) दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. खेळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. मैदानी खेळ खेळल्यामुळे आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. आपल्या जीवनात खेळाचे महत्व खूप आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन हा प्रत्येक देशात साजरा केला जातो. प्रत्येक देशाची परंपरा ही वेगळी असते. या क्रीडा दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जाते. त्यामुळे लोकांमध्ये खेळाबद्दल जागरूकता निर्माण होईल. पण तुम्हाला माहित का राष्ट्रीय क्रीडा दिवस का साजरा केला जातो? आणि त्याचे महत्व काय आहे? चला तर जाणून घेऊयात सविस्तर…
२९ ऑगस्ट १९०५ साली हॉकीपटू मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांचा जन्म झाला. ध्यानचंद हे एक महान हॉकीपटू होते. त्यांनी भारतासाठी अनेक सुवर्णपदक (gold medal) जिंकली आहेत. त्यामुळे यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाते. १९२८, १९३२, आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय होते. ध्यानचंद हे भारतीय आणि जागतिक हॉकीमधील एक महान व्यक्तिमत्त्व होते.हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्व्सनीय कामगिरी केली होती. त्यांच्या काळात त्यांनी भारतासाठी ३ वेळा सुवर्णपदक जिंकले आहेत. अनेक वर्षेनंतर देखील त्यांची जादू संपूर्ण देशावर आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तिमत्व होते. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी देशभरात सर्व ठिकाणी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जाते कारण लोकांमध्ये खेळाबाबतीत जनजागृती होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. १९५६ मध्ये ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. भारताच्या राष्ट्रपती भवनात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासह प्रमुख क्रीडा संबंधित पुरस्कार प्रदान केले जाते
ध्यानचंद यांनी हॉकी खेळामध्ये अतुलनीय कामगिरी केली होती. १९२७ मध्ये ‘लांन्स नायक’ पदावर बढती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना १९३२ मध्ये नायक (Nayak) ही पदवी देण्यात आली आणि १९३६ मध्ये सुभेदार ही पदवी देण्यात आली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याना बढती देण्यात आली होती. ध्यानचंद हे लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर (Lieutenant, Captain and Major) पदापर्यंत पोहचले होते. मेजर ध्यानचंद यांनी १९३६ मध्ये बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत (Olympic Games) भारतीय संघाचे नेतृत्व त्यांनी केले होते.
हे ही वाचा:
फेव्हरेट गायक अरमान मलिक याने युट्युबर आशना श्रॉफसोबत उरकला साखरपुडा…
Jio AirFibre बाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च… Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.