मेलबर्न कसोटीत चौथ्या सत्रात जसप्रीत बुमराहच्या नो बॉलची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. कारण २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत असंच काहींस पाहायला मिळालं होत. कारण जसप्रीत बुमराहने शेवटची विकेट घेतली खरी पण नो बॉलमुळे सर्व काही पाण्यात गेलं. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये १९२८ मध्ये ३३२ धावांचा सर्वात मोठा स्कोअर गाठण्यात यश आलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान इंग्लंडविरुद्ध गाठलं होतं. आता भारताविरुद्व ऑस्ट्रेलियाने ३३३ धावा केल्या आहे. अजूनही ऑस्ट्रेलियाच्या हाती एक विकेट आहे. त्यामुळे मेलबर्न कसोटी भारताला मोठी धावसंख्या गाठवी लागणार यात काही शंका नाही . कदाचित चौथ्या दिवशीच्या शेवटच्या षटकातच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपला असता.बुमराहच्या गोलंदाजीवर स्लिपला उभ्या असलेल्या केएल राहुलने अप्रतिम झेल पकडला. टीम इंडियाने जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. पण नो बॉलमुळे त्यावर विरजण पडलं. कारण पंचानी नो बॉल घोषित केला. केएल राहुलने दोन पायांच्या मधोमध हा झेल पकडला होता.बुमराह आणि नो बॉल ही स्थिती यापूर्वी घडली आहे. त्याचा फटका टीम इंडियाला बसला होता.
बुमराहच्या गोलंदाजीवर स्लिपला उभ्या असलेल्या केएल राहुलने अप्रतिम झेल पकडला. टीम इंडियाने जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. पण नो बॉलमुळे त्यावर विरजण पडलं. कारण पंचानी नो बॉल घोषित केला. केएल राहुलने दोन पायांच्या मधोमध हा झेल पकडला होता. बुमराह आणि नो बॉल ही स्थिती यापूर्वी घडली आहे. त्याचा फटका टीम इंडियाला बसला होता.
मेलबर्नमध्ये मागच्या ७० वर्षात २५० हून अधिक धावा गाठल्या गेल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया आतापर्यंतचं सर्वात मोठं टार्गेट देणार आहे. भारताने चौथ्या डावात ४०० प्लस धावा केल्या आहेत. मागच्या दौऱ्यात भारताने गाबामध्ये ३२९ धावा गाठल्या होत्या. मात्र पाचव्या दिवशी ३३३ हून अधिक धावा गाठणं शक्य आहे की नाही यबाबत शंका आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका