Sunday, November 19, 2023

Latest Posts

WORLDCUP 2023: वर्ल्डकपसाठी GOOGLE चे स्पेशल DOODLE

रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार, या प्रश्नाचं उत्तर आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसह संपूर्ण देशाचं लक्ष आज वर्ल्डकपकडे लागलं आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी आजच्या मॅचसाठी उत्सुक आहे.अनेक ठिकाणी क्रिक्रेटसाठी उपक्रम सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी इंडिया जर जिंकली तर एका मिसळीसोबत एक मिसळ फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया नावाचे टी-शर्ट्स, तिरंगी फुगे, ब्रेसलेट्स घालून तरुणाई दिसून येत आहे. अशातच, वर्ल्डकपच्या सामन्यासाठी गुगलने स्पेशल डुडल तयार केले आहे. प्रत्येकवेळी काही स्पेशल कारण असेल तर गुगल कडून डुडल तयार केले जाते, आणि त्यातून गुगलची क्रिएटिव्हिटी नागरिकांना पाहायला मिळते.

गुगलने सुद्धा वर्ल्ड कपच्या निमित्ताने डुडलमध्ये बदल करत बॅट -बॉल आणि वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा समावेश केला आहे. या डूडलमध्ये गुगलने पिच, स्टंप्ससह क्रिकेटच्या मैदानाचे सीन दाखवले आहेत. सीमारेषा, प्रेक्षक, आकाश आणि फटाक्यांची आतषबाजी इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच,अवकाशदेखील दाखवण्यात आले आहे. वेगळ्या स्टाईलने क्रिकेटचे साहित्य वापरुन गुगल असे लिहिण्यात आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगणार आहे. गुगल डूडल नीट पाहिलं तर लक्षात येईल की, वर्ल्डकपट्रॉफी गुगलच्या दुसऱ्या O मध्ये दिसत आहे, तर गुगलकडे L ची जागी बॅटने घेतली आहे. गुगल डूडलवर क्लिक करताच गुगल तुम्हाला एका नव्या पेजवर घेऊन जाईल जिथे तुम्हाला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या फायनल मॅचशी संबंधित प्रत्येक माहिती मिळेल. 

 

वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येणार आहेत. रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार, या प्रश्नाचं उत्तर आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणार आहे.

हे ही वाचा : 

बहुप्रितिक्षित ‘झिम्मा २’ च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात

PM KISAN: काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss