फायनल सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या आधी हवाई दलाचा एयर शो अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या आणि टीम ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ मैदानात उतरवण्यात आला आहे.
विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात २४० धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने ५४ तर राहुलने ६६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने तीन तर हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचे माफक आव्हान मिळाले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदीज करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. रोहित शर्माने वादळी सुरुवात करुन दिली, पण त्यानेही विकेट फेकली. शुभमन गिल याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात केली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शुभमन गिल अवघ्या चार धावा करुन माघारी परतला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव संभाळला. पण रोहित नेहमीप्रमाणे मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.
हे ही वाचा :
बहुप्रितिक्षित ‘झिम्मा २’ च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात
PM KISAN: काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना ?