Sunday, November 19, 2023

Latest Posts

WORLDCUP 2023: कोण जिंकणार WORLDCUP चा सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अहमदाबादच्या रणांगणात महामुकाबला होणार आहे. विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याची चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु आहे. प्रत्येकजण आज वर्ल्डकपवर कोण नाव कोरणार? याचे भाकित करत आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनीही आजच्या विश्वचषक कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीन आफ्रिदी, दिग्गज स्पिनर सकलेन मुश्ताक, मोहम्मद युसूफ यांनी आपला अंदाज वर्तवला. दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त क्रीडाप्रेमी येण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. पाकिस्तानच्या तीन दिग्गजांनी विश्वचषक कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवला आहे. मोहम्मद यूसुफ याने सर्वात आधी विश्वचषक विजयाचा दावेदार म्हणून टीम इंडियाचे नाव घेतले. त्यानंतर सकलेन मुश्ताक आणि शाहिद आफ्रिदी यांनी ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाला गवसणी घालेल, असा अंदाज वर्तवला. सर्वत्र क्रिकेटची चर्चा सुरु आहे. क्रिकेटमय वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय. गुगलने सुद्धा वर्ल्ड कपच्या निमित्ताने डुडलमध्ये बदल करत बॅट -बॉल आणि वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा समावेश केला आहे.

वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येणार आहेत. रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार, या प्रश्नाचं उत्तर आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणार आहे. विश्वचषकात भारताने सलग १० सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले आहे. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे. त्यामुळे या चुरशीच्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

बहुप्रितिक्षित ‘झिम्मा २’ च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात

PM KISAN: काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss