Friday, April 19, 2024

Latest Posts

येलो आर्मी Indian Premier league 2023 चा विजेता

IPL २०२३ चे वर्ष हे क्रिकेट प्रेमींसाठी आणि ipl प्रेमींसाठी खूप लक्षात राहील असा वर्ष आहे. कारण IPL२०२३मध्ये अंतिम सामना आहे वेळेत घेता आला नाही.IPL च्या फायनल मॅच हि अहमदाबाद येथे रंगणार होती.

IPL २०२३ चे वर्ष हे क्रिकेट प्रेमींसाठी आणि ipl प्रेमींसाठी खूप लक्षात राहील असा वर्ष आहे. कारण IPL२०२३मध्ये अंतिम सामना आहे वेळेत घेता आला नाही.IPL च्या फायनल मॅच हि अहमदाबाद येथे रंगणार होती. मात्र त्याच वेळेस वरून राजनने त्याची आगमन केले आणि त्या दिवशीछी मॅच हि सोमवारी घेण्यात येणार असा निर्णय देण्यात आला. त्यांउळे काहीशी जनता ही हिरमुसलेली दिसली. परंतु त्यानंतर सोमवारी जेव्हा याच दोन संघाची म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जने आणि गुजरात टायटन्स मैदानावर उतरले तेव्हा तोच जल्लोष तेथील लोकांच्या मनात होता. आणि तोच जोश लोकांचा होता.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा आजचा महासंग्राम पार पडला. नाणेफेक जिंकून कॅप्टन कूलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने चेन्नई सुपर किंग्स समोर २१४ धावांचा डोंगर उभा केला होता. गुजरात टायटन्सची सलामी जोडी शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा या जोडीने सुरुवात धुव्वादार केली. जगामधील सर्वात चतुर विकेटकीपर महेंद्र सिंग धोनीने प्रथम चांगल्या फॉर्ममध्ये आणि आयपीएल २०२३ मध्ये ३ शतके झळकावणारा शुभमन गिल ला फसवले आणि त्याला स्टॅम्प आऊट केले. त्यांनतर गुजरात टायटन्सचा दुसरा विकेट दीपक चाहरने रिद्धिमान साहा याचा घेतला. गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शन याने सर्वाधिक ४७ चेंडूंमध्ये ९६ धावा केल्या. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने १२ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या.

गुजरात टायटन्सची फलंदाज झाल्यांनतर चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आले आणि पुन्हा नरेंद्र मोदी स्टेडियम वर पावसाच्या धारा सुरु झाल्या. आणि मॅच ही काही तास बंद ठेवण्यात आली. त्यानंतर क्रिकेट मेम्बर्स आणीन हॅम्पयार यांच्याशी सल्ला मसलत करून त्यातून एक मार्ग काढला गेला. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पावसाने पुन्हा व्यत्यय आणला. मात्र,त्यांतर ही मॅच रात्री १२. ३० च्या सुमारास चालू झाली. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सामन्यात अखेर एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. सीएसके आता आयपीएल इतिहासात पाच वेळा चॅम्पियन ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्याकडे राखता आले नाही. सीएसकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवातही दणक्यात करून दिली, परंतु गुजरातचे हुकमी एक्के नूर अहमद व मोहित शर्मा यांनी मॅच फिरवली होती. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजाने थरारक सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंत १० धावा चोपून विजय मिळवून दिला.

हे ही वाचा:

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Sameer Wankhede यांच्या अडचणीत वाढ, ३० मे रोजी कुटूंबियांची चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss