Wednesday, November 29, 2023

Latest Posts

चेअरमन पवन मुंजाल यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त

हिरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp) कार्यकारी अध्यक्ष आणि चेअरमन पवन मुंजाल (Pawan Munjal) यांना ईडीने (ED) दणका दिला आहे.

हिरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp) कार्यकारी अध्यक्ष आणि चेअरमन पवन मुंजाल (Pawan Munjal) यांना ईडीने (ED) दणका दिला आहे. प्रवर्तन निदेशालय (ED) म्हणजे ईडीने पवन मुंजाल (Pawan Munjal) यांची 24.95 कोटींची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली आहे. ईडीने पवन मुंजाल यांची दिल्ली येथील मालमत्ता जप्त केली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA-Ministry of Corporate Affairs) हिरो मोटोकॉर्प कंपनीविरोधात तपास सुरु केला होता. आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.

 

54 कोटींची मनी लाँड्रिंग
ईडीने पवन मुंजाल आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्याच्यावर 54 कोटी रुपयांचे विदेशी चलन भारताबाहेर बेकायदेशीरपणे नेल्याचा आरोप करण्यात आला होता.

इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मदत
पवन मुंजाल यांनी इतर लोकांच्या नावाने जारी केलेले परकीय चलन मिळवले आणि नंतर त्याचा परदेशात वैयक्तिक खर्चासाठी वापर केला, असे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. परकीय चलन अधिकृत डीलर्सकडून विविध कर्मचार्‍यांच्या नावाने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने काढून घेतले आणि नंतर ते पवन मुंजाल यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला दिल्याचं समोर आलं आहे.

40 देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय
हिरो मोटोकॉर्प कंपनी 2001 मध्ये एका वर्षात सर्वाधिक दुचाकी विक्री करणारी जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी ठरली होती. कंपनीने सलग 20 वर्षे पहिलं स्थान कायम राखलं आहे. कंपनीचे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील 40 देशांमध्ये व्यवसाय आहे.

हे ही वाचा : 

दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला

दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss