Friday, April 26, 2024

Latest Posts

दहावी उत्तीर्ण ? दहावीनंतर काय करावे याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती

दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी लागला असून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहे. महाराट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल हा राज्यात ९३.८३ टक्क्याने लागला आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी लागला असून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहे. महाराट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल हा राज्यात ९३.८३ टक्क्याने लागला आहे. दहावी परीक्षेचा निकाल हा मागील वर्षापेक्षा कमी लागला आहे. मात्र यावर्षी देखील दहावीच्या परीक्षेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थांना अनेक प्रश्न पडतात. दहावी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा या गोष्टीची विद्यार्थाना व पालकांना प्रचंड चिंता सतावते. लवकरच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थांना अभ्यासक्रमाची निवड लवकरात लवकर करावी लागणार आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला आज याबद्दल माहिती सांगणार आहोत.

दहावी नंतर विद्यार्थाना कला, वाणिज्य, विज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. त्याचबरोबर दहावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी डिप्लोमा (Diploma in Engineering ) या अभ्यासक्रमासाठी देखील प्रवेश घेऊ शकतात. अभियांत्रिकी डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थांना बीइ या विषयात पदवी घेता येते. तसेच काही विद्यार्थी विज्ञान या शाखेत प्रवेश घेऊन मेडिकल (Medical), अभियांत्रिकी (Engineering) या शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षांची देखील तयारी करू शकतात. विध्यार्थाना पुढे जाऊन उद्योग अथवा बँकेत अशा क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यांनी वाणिज्य या शाखेत प्रवेश घ्यावा. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांसाठी पुढे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यावर बारावी नंतर फायनान्स (Finance), बँकिंग (Banking), त्याचबरोबर विमा क्षेत्र अश्या बऱ्याच ठिकाणी उत्तमरीत्या करिअर बनवता येते. कला शाखेत प्रवेश घेतल्यावर बारावी नंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तुम्हाला कलेची, अथवा साहित्य याची आवड असल्यास तुम्ही कला शाखेत प्रवेश घेऊ शकता. कलाशाखेतून बारावी झाल्यांनतर तुम्ही कायद्याचा अभ्यास देखील करू शकता. शिवाय तुम्ही फॅशन डिझायनिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा क्षेत्रांमध्ये देखील पारंगत होऊ शकता.

भारतात मागील काही वर्षांपासून हॉस्पिटॅलिटी (Hospitality) त्याचप्रमाणे हॉटेल इंडस्ट्री (Hotel Industry) हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारित होत आहे. त्याचबरोबर बारावी नंतर विद्यार्थी सैन्यदलात देखील दाखल होऊ शकतात. लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून दहावी नंतरचा अभ्यासक्रम निवडणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : 

कार विकायची आहे? जाणून घ्या कार विकायचा perfect time

औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांवर फडणवीस भडकले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss