spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

दक्षिण कोरियाच्या अपघातात १७९ प्रवाशांचा मृत्यू… बेली लँडिंगच्या प्रयत्नात विमानाचे झाले तुकडे…

१८१ जणांना घेऊन जाणारे जेजू एअर बोइंग ७३७-८०० विमान रविवारी लँडिंग गियर खराब झाल्यामुळे धावपट्टीवरून घसरले आणि दक्षिण कोरियामध्ये कुंपणाला धडकले.

१८१ जणांना घेऊन जाणारे जेजू एअर बोइंग ७३७-८०० विमान रविवारी लँडिंग गियर खराब झाल्यामुळे धावपट्टीवरून घसरले आणि दक्षिण कोरियामध्ये कुंपणाला धडकले. या अपघातात १७९ जणांना जीव गमवावा लागला. योनहॅप न्यूज एजन्सीने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, विमानातील दोन जण वाचले, तर इतर सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांचा मृत्यू झाला. वृत्त लिहिपर्यंत मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या जवानांनी १२० मृतदेह बाहेर काढले आहेत.

स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:०७ वाजता जेजू एअर फ्लाइट २२१६ देशाच्या नैऋत्येकडील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला. हे विमान बँकॉकहून दक्षिण कोरियाला परतत होते. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यानंतर विमान धावपट्टीवरून घसरताना आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसत आहे . स्थानिक माध्यमांच्या मते, विमानाने पक्ष्यांच्या कळपाला धडक दिली, ज्यामुळे त्याचे लँडिंग गियर खराब झाले.

द कोरिया हेराल्डने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, विमान दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न करत असताना अपघात झाला. विमानतळाला प्रदक्षिणा घातल्यानंतर लँडिंग गिअर पूर्णपणे न वाढवता इमर्जन्सी बेली लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर विमानाचे तुकडे झाले. अपघातस्थळावरून धुराचे दाट ढग उठू लागले. आतापर्यंत एक प्रवासी आणि एका क्रू मेंबरची सुटका करण्यात आली आहे. विमानात १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. प्रवाशांपैकी १७३ दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत आणि इतर २ जणांकडे थाई पासपोर्ट आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये विमान धावपट्टीवरून पुढे सरकताना आणि नंतर कुंपणाला धडकताना दिसत आहे. टक्कर झाल्यानंतर विमानात मोठा स्फोट होतो आणि त्याचे पंख उडून जातात. टक्कर झाल्यानंतर लगेचच विमानाला आग लागते.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss