Friday, December 1, 2023

Latest Posts

Israel Hamas युद्धाला तब्बल १८ दिवस पूर्ण, ४८ तासानंतर गाझात मृत्यूचे तांडव?

इस्रायल-हमास युद्धाला (Israel Hamas War) आज तब्बल १८ दिवस पूर्ण झाले आहेत. या १८ दिवसात गाझापट्टीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

इस्रायल-हमास युद्धाला (Israel Hamas War) आज तब्बल १८ दिवस पूर्ण झाले आहेत. या १८ दिवसात गाझापट्टीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. गाझापट्टीवर रोज बॉम्बचे हल्ले होत आहेत. रोज शहरातील कोणता ना कोणता भाग जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे गाझापट्टीत जगणंही मुश्किल झालं आहे. गाझात रेशन संपलं आहे. इंधनाचा पुरवठा अत्यंत कमी आहे. पाणी नाही, वीज नाही. त्यामुळे गाझातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. गाझातील रुग्णालयात ४८ तास पुरेल एवढंच इंधन बाकी आहे. 48 तासानंतर गाझातील रुग्णालयातील जनरेटर ठप्प होणार आहेत. त्यामुळे गाझातील रुग्णालयांमध्ये ४८ तासानंतर वीज नसेल. त्यामुळे रुग्णांवर उपचार होणार नाहीत. परिणामी गाझात मृत्यूचं तांडव दिसणार आहे.

गेल्या १८ दिवसात गाझापट्टीत ५ हजार पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन हजार मुलांचा समावेश आहे. तर २४ तासात १८२ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय ७ ऑक्टोबर रोजी आतापर्यंत संयुक्त राष्ट्राचे 35 हून अधिक कर्मचारी युद्धात मारले गेले आहेत. एवढं होऊनही गाझातील नागरिकांची त्रासातून सुटका झालेला नाही. कारण गाझामध्ये अन्न पदार्थ आणि पाण्याचंही संकट उभं राहिलं आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये गाझातील असंख्य रुग्णालये उद्ध्वस्त झाले आहेत. गाझातील खान यूनिस परिसरातील अल-अमल रुग्णालयावर इस्रायलनच्या एअरफोर्सने बॉम्ब डागले होते. त्यात ५०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २५० रुग्ण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर वेळेत उपचार झाले नाही तर त्यांचा मृत्यू अटळ असल्याचं हमासने म्हटलं आहे.

नॉर्थ गाझातील बेत लहिया परिसरात इंडोनेशियन रुग्णालयात वीज नाही. त्यामुळे हे रुग्णालय अंधारात बुडाले आहे. रुग्णालयातील असलेल्या सामान आणि वस्तुंचा वापर करत रुग्णालयातील रुग्णांवर उपचार केला जात आहे. पोर्टेबल लाइट्स आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णालयाती जखमींची संख्या एवढी प्रचंड आहे की त्यांना खाटेवरही ठेवता येत नाहीये. सर्व रुग्णांना जमिनीवर झोपवलं जात असून तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यामुळे येथील रुग्णालये उद्ध्वस्त झाले आहेत. या युद्धाच्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे. संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी अशी ही माहिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या घातक हल्ल्यामुले गाझापट्टीतील दोन तृतियांश रुग्णालये ठप्प झाली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे एकूण ७२ आरोग्य केंद्रांपैकी ४६ आरोग्य केंद्रे बंद आहेत. तर ३५ रुग्णालयांपैकी १२ रुग्णालये पूर्णपणे बंद झाली आहेत. पॅलेस्टाईन आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते इस्रायलच्या घेराबंदीमुळे गाझापट्टीतील इंधन जवळपास संपलेलं आहे.

हे ही वाचा : 

पुण्यातील कोयता गॅंगने हॉटेल चालकावर केला हल्ला

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss