spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

अमेरिकेतील विमान अपघातात १९ जणांचा मृत्यू, ६४ जण अजूनही विमानातच, बचावकार्य सुरूच…

एक प्रवासी विमान यूएस आर्मीच्या हेलिकॉप्टरला धडकले आणि वॉशिंग्टन डीसीमधील रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ पोटोमॅक नदीत पडले. या विमानात सुमारे ६४ लोक होते, त्यापैकी ४ क्रू मेंबर्स होते. बीएनओच्या अहवालानुसार, अपघातानंतर ४ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव कार्यादरम्यान नदीतून १९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, मृतांचा आकडा यापेक्षाही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकन एअरलाइन्सचे हे विमान विचिटा, कॅन्सस येथून उड्डाण करत वॉशिंग्टन डीसीच्या दिशेने येत होते. धावपट्टीवर लँडिंग करताना हे विमान लष्करी हेलिकॉप्टरला धडकले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान अचानक उजवीकडे झुकल्यानंतर त्याला आग लागली (फायर इन प्लेन) आणि ते वेगाने नदीत पडले. डीसी पोलिसांनी स्पष्ट केले की, मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाचे (एमपीडी) हेलिकॉप्टर या अपघातात सहभागी नव्हते. MPD या आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि बचाव कार्यात इतर एजन्सींना सहकार्य करत आहे.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सीएनएनला सांगितले की, “जेव्हा मी विमान पाहिले तेव्हा ते सामान्य दिसत होते. परंतु काही सेकंदात ते ९० अंशांपेक्षा जास्त झुकले आणि त्याच्या खाली ठिणग्या बाहेर पडू लागल्या. विमानातून ठिणग्या निघू लागल्या. टक्कर झाल्यानंतर अचानक आग लागली. अपघातानंतर अमेरिकन एअरलाइन्सचे सीईओ रॉबर्ट इसो यांनी डीसीए दुर्घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. ते म्हणाले की, दुर्घटनेत अडकलेल्या लोकांची काळजी वाटते. आमची कंपनी सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे. यासाठी तुम्ही अमेरिकन एअरलाइन्सच्या टोल फ्री क्रमांक ८००-६७९-८२१५ वर कॉल करू शकता. यूएस बाहेरील कॉलर्स अतिरिक्त फोन नंबरसाठी news.aa.com ला भेट देऊ शकतात.

Latest Posts

Don't Miss