Sunday, December 3, 2023

Latest Posts

मुकेश अंबानींच्या कंपनीला २० हजार कोटींची दिवाळी भेट!

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला 20 हजार कोटींचं दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) मिळालं आहे. कंपनीने 10 वर्षांचे बाँड विक्री किमतीला विकले आहेत.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला 20 हजार कोटींचं दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) मिळालं आहे. कंपनीने 10 वर्षांचे बाँड विक्री किमतीला विकले आहेत. रिलायन्स कंपनीने त्यांचे 10 वर्षांच्या बाँडची 7.79 व्याज दराने विक्री केली आहे, ज्यामुळे कंपनीला 20 हजार कोटीची बंपर दिवाळी भेट मिळाली आहे. रिलायन्स लिमिटेड कंपनीने शेअर बाजारात यासंदर्भात माहिती दिली आहे.

यन्स शेअर्स फ्लॅट
आज शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी रिलायन्सचे शेअर्स फ्लॅट बंद झाले. बीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स कंपनीचे शेअर्स 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 2314.30 रुपयांवर बंद झाले. आज रिलायन्स कंपनीचे शेअर्स 2308 रुपयांवर उघडले आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान 2317 रुपयांवर पोहोचले. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,635.17 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 15,65,781.62 कोटी आहे.

रिलायन्सला 20 हजार कोटींची भेट
रिलायन्स कंपनीने सांगितले की, कंपनीने सोमवारी 1,00,000 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 20,00,000 सुरक्षित, रीडीमेबल, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) जारी केले आहेत, हे खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर जारी करण्यात आले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने 7.79 टक्के व्याजाने रोखे जारी करून 20,000 कोटी रुपये उभे केले आहेत. गैर-वित्तीय भारतीय कंपनीचा हा सर्वात मोठा बाँड इश्यू आहे. व्याजदर सरकारच्या कर्ज खर्चापेक्षा 0.4 टक्के जास्त आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितलं आहे की, रिलायन्स कंपनीचे 10 वर्षांचे रोखे 7.79 टक्के व्याजाने विकले गेले आहेत.

यांचं नियोजनबाँड इश्यूचा मूळ आकार 10,000 कोटी रुपये होता. जास्त बोली लागल्यास ही रक्कम 10,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा पर्यायही होता. या आठवड्याच्या सुरुवातीला, कंपनीच्या बाँड इश्यूला 27,115 कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या. विमा कंपन्यांनी यामध्ये रस दाखवला होता. या रकमेपैकी 20 हजार कोटी रुपये त्यांनी स्वत:कडे ठेवले होते. रिलायन्स बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर एनसीडी सूचीबद्ध करण्याची योजना आखत आहे.

 

रिलायन्स शेअर्स फ्लॅट

आज शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी रिलायन्सचे शेअर्स फ्लॅट बंद झाले. बीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स कंपनीचे शेअर्स 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 2314.30 रुपयांवर बंद झाले. आज रिलायन्स कंपनीचे शेअर्स 2308 रुपयांवर उघडले आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान 2317 रुपयांवर पोहोचले. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,635.17 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 15,65,781.62 कोटी आहेत.

 

 

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss