मागील काही काळापासून राज्यातील वातावरण महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने (आरपीएफ) एका 17 वर्षीय मुलीला पाच दिवस डांबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्यात आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने बलात्कार केला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा (Pune Crime News) दाखल केला आहे.
आरपीएफ जवान अनिल पवार आणि सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी आरोपींची नावे आहे याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण ही दहावीत शिकायला असून छत्तीसगड राज्यात कुटुंबासह वास्तव्यास आहे. लीलाधर ठाकूर नावाचा मित्राने तिला भेटून ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम असून आपण पुण्याला जाऊन लग्न करू’ अशी बतावणी केली. 12 सप्टेंबर रोजी ते पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) पोहचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. तेथून त्यांना पोलिसांकडे नेले. तेथे पोलीस गणवेशात अनिल पवार हा कर्मचारी होता. पोलीस कर्मचारी अनिल पवार याने पीडित मुलगी व ठाकूर यांना बराच वेळ बसवून ठेवले.
मुलीला काम करण्याच्या बहाण्याने मुलीवर लैंगिक अत्याचार
त्यानंतर आरोपी अनिल पवारने रेल्वे कॉलनीतील एका खोलीत पीडित मुलीला आणि ठाकूर यास बंद करून टाकले आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर तिला वेगळ्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ठाकूरला या दोघांनी सोडून दिले. मात्र पवार आणि तिवारी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तिच्यावर बलात्कार करत होते.
दरम्यान, पीडित तरुणीच्या वडील छत्तीसगड पोलिसांसह पुण्यात आले आणि मुलीची सुटका केली. तिला परत घेऊन गेल्यावर तिने छत्तीसगड पोलिसांना (chhattisgarh Police) आपल्यावर घडलेली घटना सांगितली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.
हे ही वाचा :
WESTERN RAILWAY: ओव्हरहेड वायर तुटली, दुरुस्ती होऊनही गाड्या उशिराने
MARATHA RESERVATION: मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षांची बैठक
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.