Burari Building Collapse : सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी दिल्लीतील बुरारी भागात एक भीषण घटना घडली आहे. चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली सुमारे तब्बल २० लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत २ मुलांसह १२ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. आता या अपघातात २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दिल्लीतील बुरारी येथे इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू आहे. प्रकरण बुरारी येथील कौशिक एन्क्लेव्हचे आहे, जिथे २०० यार्ड परिसरात नुकतीच बांधलेली ४ मजली इमारत कोसळली होती.सीएम आतिशी सीएम आतिशी यांनी याबद्दल दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “बुरारीमध्ये इमारत कोसळण्याची ही घटना अत्यंत दुःखद आहे. मदत आणि बचाव कार्य लवकर व्हावे यासाठी मी स्थानिक प्रशासनाशी बोललो आहे. बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.”
सोमवारी रात्री इमारत कोसळल्याची माहिती मिळताच भाजप खासदार मनोज तिवारीही (BJP MP Manoj Tiwari) घटनास्थळी पोहोचले. येथे येत त्यांनी दिल्लीतील आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “हा फार मोठा निष्काळजीपणा आहे यात शंका नाही. नव्याने बांधलेली चार मजली इमारत कोसळते. येथे आल्यावर येथे कोणत्याही सुविधा नसल्याचे स्पष्ट होते. जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही.”
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता