रशियाची तिसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या कझान शहरात एकामागून एक असे तीन सिरीयल ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. कझानमधील तीन उंच इमारतींना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे इमारतींचे खूप मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनने रशियावर ९/११ सारखा भीषण हल्ला केला. या हल्ल्यांनंतर कझानमध्ये एकाच गडबड गोंधळ सुरु आहे. हल्ल्यानंतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या. शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. हल्ल्यांनंतर बचाव कार्य सुरु अस्तन आणखी एक हल्ला झाला. कझान एअरपोर्ट सुद्धा बंद करण्यात आले आहे.
युक्रेनी सैन्याने ८ ड्रोन्सने ६ इमारतींना लक्ष्य केले आहे. सतत सुरु असलेल्या या हल्ल्यामुळे रशियन नागरिकांना अंडरग्राउंड शेल्टर्समध्ये आसरा द्यावा लागला आहे. कझान शहराच्या महापौरांनी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्यास सांगितले आहे. रशियातील कझान शहरातील उंच इमारतींवर UAV हल्ला झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहेत. वेगवेगळ्या दिशांनी येणारे किलर ड्रोन हवेत इमारतींवर आदळत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कामलेव एव्हेन्यू, क्लारा जेटकिन स्ट्रीट, यूकोजींस्काया, खादी तक्ताश आणि क्रास्नाया पॉजित्सिया या इमारतींना जाऊन ड्रोन्सनी धडक दिली. दोन अन्य ड्रोन्सनी ओरेनबर्गस्की ट्रॅक्ट स्ट्रीटवरील घराला लक्ष्य बनवलं आहे. या हल्ल्यात कोणाचा मृत्यू किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाहीये. हल्ला झालेल्या ठिकाणाहून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले.
हे ही वाचा:
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक