spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पार पडली द्विपक्षीय बैठक

सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली. स्वागत झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की, मी भारतात आल्याचा खूप आनंद आहे.

सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली. स्वागत झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की, मी भारतात आल्याचा खूप आनंद आहे. जी- 20 परिषदेसाठी भारताचे अभिनंदन करतो. या परिषदेमध्ये करण्यात आलेल्या अनेक घोषणांचा फायदा जगाला होणार आहे. तसेच या दोन्ही देशांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र मिळून काम केले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सौदी अरेबियाचे (Saudi Arebia) क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल- सऊद यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या द्विपक्षीय बैठकीमध्ये व्यापार आणि सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि सौदी अरेबियाच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काऊन्सिलच्या पहिल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या देखील केल्या आहेत. तर या बैठकीमध्ये सामंजस्य करारावर देखील स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. जी-20 परिषद संपल्यानंतर मोहम्मद बिन सलमान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. द्विपक्षीय बैठकीदरम्यान राजनैतिक, संरक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आधीपेक्षा आता भारत आणि सौदी अरेबियाचे संबध आणखी चांगले होतील. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स यांनी एकत्रित या बैठकीविषयी माहिती दिली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून भारत आणि सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. त्यामुळे शांतता आणि स्थिरतेसाठी आमचा परस्पर समन्वय आवश्यक आहे.

दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढण्यासाठी आम्ही अनेक योजनांविषयी चर्चा केली. तसेच आजची बैठक ही दोन्ही देशांचे संबंध आणखी घट्ट होण्यास मदत होईल. भारत – मिडल ईस्ट- युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरवरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जी-20 परिषदेमध्ये आम्ही कॉरिडॉर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कॉरिडॉर केवळ दोन देशांना जोडणार नाही, तर आशिया, पश्चिम आशिया आणि युरोपमधील अनेक देशांना जोडणार आहे. तसेच या देशांमधील आर्थिक विकास आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील हा कॉरिडॉर महत्त्वाचा ठरु शकतो. सौदी अरेबिया हा पश्चिम आशियातील भारताची प्रमुख धोरणात्मक भागीदारी असणार देश आहे. मागील काही वर्षांमध्ये दोन्ही देशांच्या संबंध आणखी घट्ट झाले आहेत.

हे ही वाचा: 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भीमाशंकराकडे प्रार्थना…

चाहत्यांनी दिलेल्या कमेंटवर गश्मीर महाजनी म्हणाला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss