भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुट्टानी या गावी झाला.तिरुट्टानी हे गाव चेन्नईपासून ८४ किमी अंतरावर आहे आणि ते १९६० पर्यंत आंध्र प्रदेशात होते आणि सध्या ते तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात येते.त्यांचे जन्मस्थान हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.०५ सप्टेंबर हा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. डॉ राधाकृष्णन खूप अभ्यासू होते आणि स्वामी विवेकानंदांना ते खूप मानत होते. तर यंदाच्या वर्षी तुम्हाला देखील तुमच्या शिक्षणासोबत शिक्षक दिन साजरा करायचं असणार. आम्ही तुम्हाला काही शिक्षक दिन संदेश शेर करत आहोत .
गुरुवीण न मिळे ज्ञान , ज्ञानावीण न होई जगी सन्मान , जीवभवसागर तराया , चला वंदू गुरुराया…शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिकवता शिकवता आपणास , आकाशाला गवसणी घालण्याचे , सामर्थ्य देणारे आदराचे, स्थान म्हणजे आपले शिक्षक , शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु ब्राह्म , गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा , गुरुसाक्षात परब्रह्म , तस्माईश्री गुरुवे नमः शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माता गुरु आहे , पिताही गुरु आहे , विद्यालयातील शिक्षक गुरु आहेत , ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरु आहेत. ह्या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्वांना कोटी कोटी प्रणाम. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही. अश्या सर्व शिक्षकांना शतशः नमन. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगू ईच्छितो की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला शिकवता, आमची काळजी घेता, आमच्यावर प्रेम करता , हे तुम्हाला जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवते. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे ही वाचा:
चॅटजीपीटीद्वारे लसीकरणाला चलाना मिळणार
सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा होणार दमदार पावसाला सुरुवात
अवधूत गुप्तेची नवी कलाकृती, प्रेक्षकांसाठी नवीन पर्वणी …