Saturday, April 20, 2024

Latest Posts

रुळावरून घसरलेली रेल्वे अशाप्रकारे परत रुळावर आणली जाते; जाणून घ्या सविस्तर

भारतात ओडिशा येथील बालासोर येथे रेल्वेचा अत्यंत गंभीर अपघात झाला. या अपघातात साधारण ३०० पेक्षाजास्त जणांना आपला जीव गमवावा लागला त्याचबरोबर १००० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत.

भारतात ओडिशा येथील बालासोर येथे रेल्वेचा अत्यंत गंभीर अपघात झाला. या अपघातात साधारण ३०० पेक्षाजास्त जणांना आपला जीव गमवावा लागला त्याचबरोबर १००० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेची गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातामध्ये केली जाते. २००४ नंतर ही घटना जगातील सर्वात मोठी रेल्वे दुर्घटना मानली जाते. रेल्वेची ही दुर्दैवी घटना अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी आहे. या घटनेचे फोटोज आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. रेल्वेचे डबे रुळावरून घसरून ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतून रेल्वे यंत्रणेचा गैर कारभार उघडकीस आला असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंतप्रधान मोदींनी देखील घटनास्थळी भेट देऊन दुःख व्यक्त केले आहे. जगातील अनेक नेत्यांनी देखील याघटने बाबत शोक व्यक्त केला आहे. या अपघातामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल कि रुळावरून घसरलेली रेल्वे ही पुन्हा रुळावर कश्याप्रकारे नेली जाते. चला तर मग याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

रेल्वे ही काही हलक्या वाहनांमध्ये येत नाही. रेल्वे ही काही बाईकसारखी नाही जी उचलून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ठेवली जाऊ शकते. अनेकांना वाटते कि मोठ्या यंत्राच्या साहाय्याने रेल्वे रुळावर ठेवली जात असेल परंतु तसे केले जात नाही. रेल्वेचे अनेक डबे असतात त्यांना रुळावर परत नेण्यासाठी एका युक्तीचा वापर केला जातो. यासाठी कोणतेही मोठे यंत्र वापरले जात नाही.

तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु रेल्वे ही दोन प्लॅस्टिकच्या तुकड्यांच्या आधारे रुळावर चढवली जाते. रेल्वे रुळावर चढविण्यासाठी सर्वात आधी प्लास्टिकचे दोन मोठे तुकडे रुळावर ठेवले जाते. या फलाटाच्या आधारे सर्वप्रथम रुळावरून घसरलेले इंजिन रुळावर चढविले जाते. त्याचबरोबर रेल्वेचे अन्य डबे इंजिनच्या मागे बांधले जातात. या प्लॅस्टिकच्या फलाटाच्या साहाय्याने रेल्वेचे डबे एक एक करून रुळावर चढविले जातात. प्लास्टिकचे तुकडे हे रुळाच्या बरोबरीचे असतात त्यामुळे घसरलेल्या रेल्वेची चाके प्लॅस्टिकच्या तुकड्यांवर चढताच रुळावर येतात. अशाप्रकारे रेल्वे रुळावर चढविण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.

हे ही वाचा : 

श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघावरून दिली प्रतिक्रिया

Mouni Roy चे अंधेरीत नवे रेस्टॉरंट, अनेक कलाकारांनी लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss