Manu Bhaker Grandmother Uncle Road Accident : भारताची स्टार नेमबाज मनु भाकर हिला दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार मिळाला. पण तिच्यावर आता काळाने घात केला आहे. तिच्या घरी एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. भारताची स्टार नेमबाज मनु भाकर हीचा मामा आणि आजी एका रोड अपघातात जागीच मरण पावले.
आज (रविवारी) सकाळी ९;३० वाजताच्या सुमारास चरखी दादरी येथील महेंद्रगड बायपासरोडवर हा अपघात झाला आहे. मनु भाकरचे मामा आणि आजी स्कुटरवरून जात असताना अचानक ब्रेझा करणे दोघांना धडक दिली आणि ही धडक एवढी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मनू भाकरच्या मामाचे वय (५०) तर आजीचे वय (७०) एवढे होते. मनु भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही मूळ हरियाणामधील भिवानी जिल्ह्यातील कळली गावाचे रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मनु भाकरचे मामा आणि आजीचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. पोलीस पोहोचेपर्यंत वाहनाचा चालक फरार झाला होता.
हा अपघात नेमका घडला कसा?
मनु भाकरचे मामा युद्धवीर सिंग रोडवेज बसमध्ये ड्रायव्हर होते. त्याचे घर महेंद्रगड बायपासवरच आहे. ते सकाळी त्याच्या स्कूटरवरून ड्युटीवर निघाले होते. तर मनूची आजी सावित्री देवी जवळच्या लोहारू चौकात तिच्या धाकट्या मुलाच्या घरी चालल्या होत्या. दोघेही कालियाना वळणावर पोहोचताच त्यांना समोरून एक ब्रेझा कार येताना दिसली. गाडी चुकीच्या बाजूने येत होती आणि तिचा वेग खूप जास्त होता. कार चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने मनु भाकरच्या मामाच्या स्कूटरला धडक दिली. मनुचे मामा आणि आजी रस्त्यावर पडले आणि जखमी झाले. पण ही धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती