Friday, April 26, 2024

Latest Posts

Akasa Airlines च्या विमानात चक्क टॉयलेटमध्ये विडी ओढण्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

सध्या विमानामध्ये नेहमीच कोणत्याना कोणत्या घटना या होत आहेत. तसेच साप, उंदीर, ढेकणं आणि पक्षी देखील यापूर्वी विमानातन आढळून आले आहेत.

सध्या विमानामध्ये नेहमीच कोणत्याना कोणत्या घटना या होत आहेत. तसेच साप, उंदीर, ढेकणं आणि पक्षी देखील यापूर्वी विमानातन आढळून आले आहेत. तर कधी विमानात भांडण तर कधी एयरहोस्टेसशी छेडछाड, सहप्रवाशावर लघुशंका करण्याचे प्रकार देखील झाले आहेत. आता अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. आता, तर एका प्रवाशाने विमानात चक्क विडी ओढल्याची घटना घडली आहे.

बंगळुरुला जाणाऱ्या अकासा एअर लाइन्सच्या विमानात हा प्रकार घडला. या संदर्भात एका ५६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर फ्लाइटमध्ये बिडी ओढल्याचा आरोप आहे. प्रवीण कुमार असे आरोपीचे नाव आहे. या विमानाने ते अहमदाबादहून बंगळुरूला जात होते. प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी कुमारला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.

विमानतळावर उतरल्यानंतर एअरलाइन्सच्या ड्युटी मॅनेजरने केआयए पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रवीण कुमार हा राजस्थानमधील मारवाड भागातील रहिवासी आहे. एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सनी त्याला टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना पकडले. नंतर त्यांची रवानगी बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. येथे त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या आयुष्यातील ही पहिलीच विमान प्रवास होती आणि त्याला नियमांची माहिती नव्हती.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्याने पोलिसांना सांगितले की, “तो पहिल्यांदा विमानात बसला होता. त्यांच्यापैकी बहुतेक जण ट्रेनने प्रवास करत आहेत आणि अनेकदा शौचालयात गेल्यावर धुम्रपान करत होते. मला वाटलं इथे पण करता येईल, म्हणून मी विमानाच्या टॉयलेटमध्ये विडी ओढली. त्याचवेळी, या प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विमानात प्रवास करताना बिडी ओळखू न येणे ही सुरक्षेतील मोठी त्रुटी आहे.

तसेच कुमार पुढे म्हणाला की, विमानात धुम्रपान करण्याच्या नियमांची माहिती नव्हती. त्याला सध्या बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक केल्यानंतर आरोपीला किमान आठवडाभर न्यायालयीन कोठडीत ठेवले जाते. याआधी वर्षाच्या सुरुवातीला विमानात सिगारेट पेटवल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss