मणिपूर (Manipur) हिंचसाराचा परिणाम आता राजस्थानमध्ये (Rajasthan) दिसून आला आहेत. राजस्थानमध्ये एका महिलेला विवस्त्र करून मारण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. ही महिला मारहाण करताना ओरडत असताना देखील तिला कोणी सोडले नाही. या घटनेचा पोलीस कसून तपास करणार आहेत.
राजस्थानमधील पहाडी (Pahadi) गावात गुरुवारी एका २१ वर्षीय महिलेला तिच्या पतीने आणि नातेवाईकांनी विवस्त्र करून मारहाण केली. आणि तिची धींड काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला आणि अन्य तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिस महासंचलकाचे उमेश मिश्रा (Umesh Mishra) यांनी या घटनेची दखल घेतली आहे. मिश्रा हे या घटनेचा कसून तपास करत आहेत. या प्रकरणी आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांनी ६ जणांची टीम तयार केली आहे. प्रतापगढ (Pratapgarh) पोलिस अधीक्षक अमित कुमार अधिक तपास करत आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ‘एका महिलेलेा मारहाण करून विवस्त्र केल्याचा एक व्हिडीओ मीडियावर व्हायरल होत आहे. सुसंस्कृत समाजात अशा घटनांना स्थान नाही.आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून हे प्रकरण फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे’.
या घटनेवर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी सरकारवर टीका केली आहे. वसुंधरा राजे म्हणाले ‘ गर्भवती महिलेचा न विवस्त्र धींड काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मात्र प्रशासनाला मात्र याबाबत कोणतीच माहिती नन्हती. या घटनेने राजस्थाची मान शरमेने झुकली आहे’. राजस्थानमधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.
हे ही वाचा:
Sai Tamhankar ने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर, म्हणाली…
जालन्यातील घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, सरकारचं चुकलंच!…
ASIA CUP 2023, आशिया चषकात भारत-पाकिस्तानविरुद्धचा सामना आज रंगणार, कोणत्या खेळाडूंवर अधिक लक्ष…?