spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या जोडीदारानेच निर्घृण केली हत्या

मध्यप्रदेशच्या देवसामध्ये एका धक्कादायक हत्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या जोडीदारानेच निर्घृण हत्या केली. मित्राच्या मदतीने मिळून त्याने तिचा खून केला. त्याचा साथीदार राजस्थानच्या तुरुंगात बंद आहे. पोलीस त्याचा रिमांड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेमकं काय प्रकार..
देवासमध्ये बायपास रोडवर वृंदावन धाम कॉलनी येथील एका घरात ही घटना घडली. या घराचे मालक धीरेंद्र श्रीवास्तव मागच्या सहा महिन्यांपासून दुबईत आहेत. या घराच्या उजव्या बाजूला एक रुम, किचन आणि टॉयलेट आहे. डाव्याबाजूला दोन बेडरुम आणि हॉल आहे. दोन्ही बाजू वरच्या मजल्यावर जाणाऱ्या शिड्यांनी जोडलेल्या आहेत. वरचा मजला हा श्रीवास्तव यांच्या ताब्यात आहे.

बलवीर राजपूत यांनी जुलै 2024 पासून तळमजला भाड्यावर घेतला होता. बलबीर हे दुबईत राहणारे घराचे मालक धीरेंद्र श्रीवास्तव यांना घराच्या दुसऱ्या दोन रुम वापरण्यास परवानगी द्यावी म्हणून सतत विनंती करत होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते येथे राहतात. बलवीर राजपूत यांच्याआधी धीरेंद्र श्रीवास्तव यांनी संजय पाटीदार यांना हे घर भाड्यावर दिलं होतं. संजय यांनी जून 2024 मध्ये घर खाली केलं. पण दोन खोल्यांमध्ये काही सामान सोडलं होतं. या दरम्यान संजय इथे येऊन-जाऊन असायचा. पण तो सामान असलेल्या दोन रुम्स रिकामी करत नव्हता व भाडं सुद्धा देत नव्हता.

घरमालकाने बलवीर राजपूत यांना बंद असलेले ते दोन रुम उघडण्याची परवानगी दिली. गुरुवारी बलबीर यांनी टाळं तोडून त्या रुममध्ये प्रवेश केला. साफसफाई करताना फ्रीज चालू असल्याच त्यांना दिसलं. आधीचा भाडेकरु संजय पाटीदारच्या बेजबाबदारपणावर ते वैतागले. यामुळे आपल्याला जास्त लाईट बील येतं असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी फ्रीज बंद केला. सकाळी सामान आपण बाहेर काढू असं त्यांनी ठरवलं. शुक्रवारी सकाळी मात्र बंद खोलीतून अत्यंत घाण वास येऊ लागला. शेजाऱ्यांनी या बद्दल पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यांनी फीज उघडला आणि फ्रीज उघडल्यानंतर त्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.

का केली हत्या?

मृत महिलेच नाव पिंकी ऊर्फ प्रतिभा प्रजापती होतं. संजय पाटीदारची ती लिव्ह इन पार्टनर होती. बेडशीट गुंडाळलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. संजयने चौकशीत पोलिसांना सांगितलं की, पिंकी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. म्हणून त्याने मित्राच्या मदतीने गळा आवळून तिची हत्या केली व फ्रीजमध्ये मृतदेह ठेवला. त्याने फ्रीज सुरुच ठेवल्यामुळे या हत्येचा इतके महिने उलगडा होऊ शकला नाही.

Latest Posts

Don't Miss