Thursday, November 30, 2023

Latest Posts

कोटी भारतीयांचा आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित डेटा लीक

८१.५ भारतीयांची आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित माहिती चोरीला गेल्याची मोठी माहिती समोर आली आहे. एका अमेरिकन फर्मने डेटा लीक झाल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे.

८१.५ भारतीयांची आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित माहिती चोरीला गेल्याची मोठी माहिती समोर आली आहे. एका अमेरिकन फर्मने डेटा लीक झाल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. डार्क वेबवर आधार डेटा लीक झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. डार्क वेबवर ८१.५ कोटी भारतीयांचा आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित डेटा लीक झाल्याचा दावा अमेरिकन कंपनीने केला आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीचा दावा आहे की, ८१.५ कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे.

 

पासपोर्ट- आधार संबंधित माहिती चोरीला

लीक झालेल्या माहितीमध्ये नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती आहे. इतकंच नाही तर हा डेटा ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. अमेरिकन फर्मने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ९ ऑक्टोबर रोजी ‘pwn0001’ या व्यक्तीने ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ८१.५ कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती देण्यात आली आणि हा डेटा विकण्याचा प्रयत्न केला गेला. सुरक्षा अहवालानुसार, संबंधित व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ८० हजार डॉलरमध्ये विकण्याची ऑफर दिली होती.

कोविड पोर्टलवरील डेटा चोरीला?
मीडिया रिपोर्टनुसार, लीक झालेला डेटा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडील असू शकतो. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, ICMR ने अद्याप यासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. pwn0001 द्वारे शोधलेल्या या डेटा लीकची सीबीआय चौकशी करत असल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा : 

कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss