केंद्र सरकारने ११.५ कोटी पॅन कार्ड बंद केले आहेत. पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. एका आरटीआयला उत्तर देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अशी माहिती दिली की, पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख ३० जून होती. दिलेल्या मुदतीत दोन्ही कार्ड लिंक न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. देशात या पॅन कार्डची संख्या ७०.२४ कोटींवर पोहोचली आहे. त्यापैकी ५७.२५ कोटी लोकांनी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले होते. जवळपास १२ कोटी लोकांनी ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण केली नाही. यापैकी ११.५ कोटी लोकांची कार्डे निष्क्रिय करण्यात आली आहेत. प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ AA अंतर्गत पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. या आदेशानुसार जे नागरिक पॅन-आधार लिंक करण्यात अयशस्वी झाले आहेत, त्यांना १००० रुपयांचा दंड भरून त्यांचे कार्ड पुन्हा सक्रिय करता येईल. पॅन कार्ड बंद झाल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Central Board of Direct Taxation अर्थात CBDT नुसार, असे नागरिक प्राप्तिकर परतावा मागू शकणार नाहीत.
त्यांचे डीमॅट खाते उघडले जाणार नाही आणि म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्याची परवानगी दिली जाणार नाही.शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी तुम्ही १ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ शकणार नाही. वाहन खरेदीवर जास्त कर भरावा लागणार आहे. बँकेत एफडी आणि बचत खाते वगळता कोणतेही खाते उघडता येणार नाही. क्रेडिट आणि डेबिट कार्ड जारी केले जाणार नाहीत. विमा पॉलिसी प्रीमियमसाठी तुम्हाला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम भारत येणार नाही. तसेच, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवर जास्त कर लागणार आहे.
हे ही वाचा :
यंदा November – December मध्ये फिरायला जायचा विचार करताय? तर या ठिकाणांना नक्की भेट द्या