सध्या व्यावसायिकतेच्या पातळीवर अदानी ग्रुपचे नाव जोरदार चालू असते. गौतम अदानी हा व्यवसायिकतेमधील मोठा ग्रुप आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समुहाच्या अडचणी आणखी वाढल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या हिंडनबर्ग रिपोर्टमधून अदानी समुहावर मोठे आरोप करण्यात आले होते. आता आणखी एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. एका नव्या रिपोर्टमध्ये कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि दावा करण्यात आला आहे की, अदानी कुटुंबातील भागीदारांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘अपारदर्शक’ फंडांचा वापर केला आहे. हा अहवाल समोर येताच शेअर मार्केटमध्येही याचे पडसाद पाहायला मिळाले. शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाचे सर्व शेअर्स कोसळले आहेत.
या संदर्भात अदानी समूहाने गुपचूप स्वत:चेच शेअर्स खरेदी करून स्टॉक एक्स्चेंजमध्ये लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा एका मीडिया समूहाच्या अहवालात करण्यात आला आहे. ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCRP) ने हा रिपोर्ट गार्डियन (Guardian) आणि फायनान्शियल टाईम्सला (Financial Times) शेअर केला आहे. यामध्ये पहिल्यांदाच अदानी समुहानं मॉरिशसमध्ये केलेल्या व्यवहारांचा तपशील जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार २०१३ ते २०१८ या कालावधीत अदानी समुहाच्याच कंपन्यांनी त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले असल्याचं समोर आलं आहे. नॉन-प्रॉफिट मीडिया ऑर्गनायझेशन OCCRP चा दावा आहे की, त्यांनी मॉरिशसला झालेले ट्रान्झॅक्शन्स आणि अदानी ग्रुपच्या अंतर्गत ईमेलद्वारे झालेले व्यवहार पाहिले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या तपासात असं उघड झालं आहे की, गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाचे शेअर्स खरेदी आणि विक्री केल्याची किमान दोन प्रकरणं आहेत.
OCCRP अहवालात गुरुवारी नसीर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग या दोन गुंतवणूकदारांची नावं आहेत. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हे अदानी कुटुंबाचे दीर्घकालीन व्यावसायिक भागीदार (Longtime Business Partners) आहेत आणि OCCRP नं आपल्या रिपोर्टमध्ये या दोन्ही गुंतवणुकदारांची चौकशी केल्याचं म्हटलं आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, OCCRP नं असा दावा केला आहे की, चांग आणि अहली यांनी गुंतवलेले पैसे अदानी कुटुंबानं दिल्याचा कोणताही पुरावा नाही, परंतु रिपोर्टिंग आणि डॉक्युमेंट्सवरून हे स्पष्ट झालं आहे की, अदानी समुहात त्यांची गुंतवणूक अदानी समूहानेच केली होती. हे सर्व व्यवहार सामंजस्यानं झाले होते. OCCRP नं सांगितलं की, ही व्यवस्था कायद्याचं उल्लंघन करते की नाही? हा प्रश्न अहली आणि चांग प्रमोटर्सच्या वतीने काम करत आहेत की नाही? यावर अवलंबून आहे. अदानी ग्रुपमध्ये अदानी ग्रुप हा एकमेव प्रमोटर आहे. तसं असल्यास, अदानी होल्डिंग्जमधील त्यांची हिस्सेदारी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त होईल.
दरम्यान, अदानी समूहानं एक निवेदन जारी करून OCCRP च्या अहवालातून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. अदानी समुहानं म्हटलं आहे की, ही सोरोसला पाठिंबा देणाऱ्या संघटनांची कृती असल्याचं दिसतंय. हिंडनबर्ग अहवालातील दावे पुन्हा जिवंत करता यावेत, म्हणून परदेशी माध्यमांचा एक भागही याला वाव देत आहे. हे दावे एका दशकापूर्वी बंद झालेल्या प्रकरणांवर आधारित आहेत. त्यानंतर डीआरआयनं ओव्हर इनव्हॉइसिंग, परदेशात निधी हस्तांतरित करणं, संबंधित पक्ष व्यवहार आणि एफपीआयद्वारे गुंतवणूक या आरोपांची चौकशी केली होती. एक इंडिपेंडेंट एज्युकेटिंग अथॉरिटी आणि एका अपीलेट ट्रिब्यूनलनं पुष्टी केली की, कोणतंही ओव्हर-व्हॅल्युएशन नव्हतं आणि ट्रांन्जॅक्शन्स कायद्यांनुसार होते. मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं आमच्या बाजूनं निर्णय दिला. त्यामुळे या आरोपांना कोणताही आधार नाही.
हे ही वाचा:
अहमदनगर जिह्ल्यात पुन्हा वाढले लम्पी आजाराचे रुग्ण
तब्बल १३ वर्षांनी मुंडे भावंडानी एकत्र येत साजरा केला रक्षाबंधन सण