Saturday, April 20, 2024

Latest Posts

१२ वी कॉमर्स नंतर हे डिप्लोमा कोर्सेस तुमच्यासाठी ठरतील वरदान

काही विद्यार्थी लवकर शिक्षण घेऊन लगेच करीअर घडविण्याला प्राधान्य देतात. त्याची कारणे ही अनेक असतात. काही मुलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असते त्यासाठी घराला आधार देण्यासाठी त्यांना चांगले करीअर घडविण्याची गरज असते.

काही विद्यार्थी लवकर शिक्षण घेऊन लगेच करीअर घडविण्याला प्राधान्य देतात. त्याची कारणे ही अनेक असतात. काही मुलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असते त्यासाठी घराला आधार देण्यासाठी त्यांना चांगले करीअर घडविण्याची गरज असते. १२ वी नंतर उपलब्ध असणारे डिग्री कोर्सेस हे कमीत कमी ३ वर्षांचे असतात. त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थांना तीन वर्षे द्यावी लागतात. परंतु आता तुम्ही बारावी नंतर डिप्लोमा कोर्सेस देखील तुम्ही करु शकता. हे डिप्लोमा कोर्सेस शॉर्ट टर्म ( Short term) म्हणजेच कमी कालावधी साठी असतात. हे डिप्लोमा कोर्सेस करून विद्यार्थी कमी कालावधीत ज्ञान प्राप्त करु शकतात. आणि स्वतःचे करिअर बनवु शकतात. चला तर १२ वी कॉमर्स नंतर कोणकोणते डिप्लोमा कोर्सेस करू शकतो याची माहिती घेऊया.

डिप्लोमा इन टॅली ई आर पी (Diploma in Tally ERP)

टॅली हा कोर्स १२ वी नंतर करु शकतो. हा कोर्स करून विद्यार्थांना अकाऊंट सेक्टर मध्ये करिअर ची संधी निर्माण होईल. टॅली चा उपयोग अनेक मोठमोठ्या व्यवसायांमध्ये केला जातो. टॅली हा सर्वात लोकप्रिय त्याचबरोबर सक्षम सॉफ्टवेअर आहे.

डिप्लोमा इन इ कॉमर्स ( Diploma in E-commerce)

सध्याच्या डिजिटल दुनियेत इ कॉमर्स चा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. आणि त्यामूळे हे इ कॉमर्स क्षेत्र हे प्रचंड विस्तारले आहे. त्यामूळे अनेक विद्यार्थांना इ कॉमर्स क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कॉमर्स मधून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करिअरचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्स ( Diploma in Management course)

बारावी नंतर विद्यार्थांना व्यवसाय व्यवस्थापन करण्याची आवड असेल तर हा कोर्स त्यांच्यासाठी करिअर चा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर व्यावसायिक क्षेत्रात रुची असेल तर तुम्ही हा कोर्स करु शकता. हा कोर्स केल्याने अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग ( Diploma in Digital Marketing)

हा डिप्लोमा कोर्स सध्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या इंटरनेट (Internet) च्या दुनियेत सध्या लहान व्यवसायापासून ते मोठमोठ्या कंपनी डिजिटल मार्केटिंग करतात. तसेच हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले असून विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात करिअर च्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या आहेत.

हे ही वाचा : 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ३ टक्यांनी घटला

HSC चा निकाल पाहायचा? घ्या या स्टेप्स जाणून

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss