Sunday, May 28, 2023

Latest Posts

बारावी नंतर हे Diploma Courses मुलींचे करिअर बनवू शकेल उत्तम

आपल्या भारतात अनेक डिप्लोमा कोर्सेस (Diploma Courses) उपलब्ध आहेत. पण काही असे कोर्सेस आहेत ज्यामध्ये मुली उत्तम रित्या आपले करिअर बनवू शकतात. हे डिम्प्लोमा मुलीचं नाही तर मुलं देखील करू शकतात.

आपल्या भारतात अनेक डिप्लोमा कोर्सेस (Diploma Courses) उपलब्ध आहेत. पण काही असे कोर्सेस आहेत ज्यामध्ये मुली उत्तम रित्या आपले करिअर बनवू शकतात. हे डिम्प्लोमा मुलीचं नाही तर मुलं देखील करू शकतात. परंतु मुलींना या विषयात मुलांपेक्षा जास्त रुची असते. त्यामुळे मुली कदाचित या विषयात अधिक पारंगत होऊ शकतात. तसेच अगदी कमी पैशात आणि कमी कालावधीत हे कोर्स पूर्ण करून मुली यामध्ये उत्तम करिअर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे कोर्स आहेत तरी कोणते.

डिप्लोमा इन फॅशन डिझाईन (Diploma in Fashion Design)

मुली आणि फॅशन यांच समीकरण हे चांगलच जुळत. असे मानले जाते कि मुलींना मुलांपेक्षा फॅशन मधले अधिक जास्त समजते. त्याचबरोबर फॅशन डिझाईनिंग हे मुलींमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. बहुतांश मुलींना फॅशन ची आवडत असते. आजकाल फॅशन ला प्रचंड महत्व आले आहे. दररोज नवनवीन फॅशन आपल्याला पाहण्यास मिळतात अश्या ट्रेंडिंग मध्ये असणाऱ्या फॅशन ला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते. फॅशन डिझायनिंग मध्ये फॅशन संबंधित अनेक गोष्टी शिकविल्या जातात. कॉस्ट्यूम डिझायनिंग (Costume designing) पासून ते फॅशन मार्केटिंग (Fashion marketing) बद्दल अनेक गोष्टींबद्दल शिकविले जाते. अनेक इन्स्टिट्यूट (Institute) अथवा कॉलेज (College) मधून हा कोर्स प्रदान केला जातो.

डिप्लोमा इन इंटेरिअर डिझायनिंग (Diploma in Interior designing)

इंटेरिअर डिझायनिंग या कोर्से मध्ये घरचा आतील भाग कसा सजवायचा, कोणकोणते साहित्य वापरावे या सगळ्याचे ज्ञान या कोर्स मधून प्राप्त होते. या विषयात मुली अगदी पारंगत असतात. भारतात अनेक इन्स्टिट्यूट तसेच कॉलेजेस हा कोर्स प्रदान करतात. साधारण हा कोर्सचा अभ्यासक्रम ६ महिने अथवा १ वर्षाचा असतो.

डिप्लोमा इन टेक्सटाईल डिझायनिंग (Diploma in Textile Designing)

डिप्लोमा इन टेक्सटाईल डिझायनिंग या कोर्स मध्ये नवीन कड्यावर एम्ब्रॉईडरी डझाईन्स (Embroidery Designs) कश्या बनवायच्या याचे ज्ञान दिले जाते. या क्षेत्रात करिअर च्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुली या विषयात उत्तम रित्या आपले करिअर बनवू शकतात.

डिप्लोमा इन ज्वेलरी डिझायनिंग (Diploma in jewelry Designing)

मुलींना ज्वेलरीची अगदी लहान पानापासून आवड असते. त्याचबरोबर काही मुलींना दागदागिने बनविण्याची देखील आवड असते. काही मुली बागेत गेल्यावर काही वेळेस फुलांची अंगठी, माळ बनवतात. दागदागिन्यांची रुची असलेल्या मुलींसाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे. या क्षेत्रात मुलांना मोठया प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. अगदी कमी कालावधी मुली हा कोर्स पूर्ण करून त्यात उत्तम करिअर करू शकतात.

हे ही वाचा:

बारावी उत्तीर्ण? या सरकारी नोकरी ठरतील तुमच्यासाठी उत्तम पर्याय

कोण करणार अंतिम फेरीत प्रवेश, मुंबई की गुजरात

नेहरुंचे नाव बदलू शकता पण कोट्यवधी लोकांच्या मनातून कसे हटवणार? काँग्रेसने केली टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss