Friday, March 29, 2024

Latest Posts

कुरुलकरांच्या पाठोपाठ निखिल शेंडेही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर आणि भारतीय वायुदलात तैनात असलेले निखिल शेंडे या दोघांना फसवण्यात आले होते आणि दोन मध्यमवयीन वयाच्या महिलांचे फोटो वापरण्यात आले आहेत.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर आणि भारतीय वायुदलात तैनात असलेले निखिल शेंडे या दोघांना फसवण्यात आले होते आणि दोन मध्यमवयीन वयाच्या महिलांचे फोटो वापरण्यात आले आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनेकदा अनोळखी महिलांकडून फ्रेंड रिक्वेस्ट येत असतात. असेच संपर्क साधणाऱ्या झारा दासगुप्तांने तिचं वय तिचे वय ३५ असल्याचे आणि ती लंडनमध्ये राहते असे तिने निखिल शेंडेंशी संवाद केलेल्या महिलेने सांगितले. परंतु या दोघीनी संपर्क साधण्यासाठी पाकिस्तानमधील एकच इंटरनेट वापराने आणि या घटनेचा खुलासा झाला. प्रदीप कुरुलकरांना मंगळवारी न्यायालयामध्ये हजार केले होते. कुरुलकरांना १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले तर न्यायालय निखिल शेंडेंची चौकशी करणार.

प्रदीप कुरुलकर आणि निखिल शेंडेंना जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी हीच पद्धत वापरण्यात यावी. हे दोघेही कित्येक महिने आपण एकाच महिलेशी संवाद साधतोय या भ्रमामध्ये त्यांच्याकडील सर्व माहिती पाकिस्तानी गुपचर यंत्रणेला देत होते. जर सायबर एक्स्पर्टच्या मते अशा संवादामध्ये समोरच्या व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही लिंकला जर क्लिक करून ओपन केले तर आपल्या मोबाईलचा पूर्ण एक्सेस समोरच्या व्यक्तीकडे जातो. ३५ वर्षाच्या झारा दासगुप्तांने ६३ वर्षाच्या प्रदीप कुरुलकरांना भुरळ पडायला सुरुवात केली. झारा दास गुप्तांने हळहळू कुरुलकरांना तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी सांगायला सुरुवात केली. मग कुरुलकर देखील आणखी मोकळेपणाने तिच्याशी बोलू लागले. झारा दासगुप्तांने तिचे वेगवगेळे फोटो पाठवायला सुरुवात केली. अनेकदा हे फोटो अर्धनग्न फोटो देखील त्यांना पाठवले गेले आणि या दोघांमध्ये दररोज प्रचंड प्रमाणात चॅटिंग होण्यास सुरुवात केली.

फेब्रुवारी महिन्यामध्ये ही झारा दासगुप्ता म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असल्याचं भारतीय गुप्तचर विभागाला लक्षात आहे. प्रदीप कुरुलकर यांना कळताच त्यांनी त्या नंबर ला ब्लॉक केले आणि त्यांनतर त्या महिलेने दुसऱ्या नंबर वरून विचारणा करायला सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने जेव्हा याचा तपास सुरु केला तेव्हा दुसऱ्या नंबर वरून केलेल्या मेसेजचा शोध सुरु केला. तेव्हा या दुसऱ्या नंबर वरून भारतीय वायुदलातील निखिल शेंडेंशी मागील बऱ्याच महिन्यापासून चॅटिंग होत असल्याचे समोर आले आणि त्यानंतर एटीएसने त्यांची चौकशी करायचे ठरवले. १४ दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्याने प्रदीप कुरुलकरांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले. तर दुसरीकडे निखिल शेंडेंने भारतीय वायुदलाची कोणती माहिती पाकिस्तानला दिलीय का? याचाही शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss