spot_img
spot_img

Latest Posts

गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा याने दिला देशवासीयांसाठी संदेश

भारताचा प्रसिद्ध भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा(Neeraj Chopra) याने पुन्हा एकदा भारतच नाव उंचावले आहे. त्याने आणखी एक गोल्ड मेडल जिंकले आहे.

भारताचा प्रसिद्ध भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा(Neeraj Chopra) याने पुन्हा एकदा भारतच नाव उंचावले आहे. त्याने आणखी एक गोल्ड मेडल जिंकले आहे. फायनलमध्ये पाकिस्तानचा अरशद नदीम याला टक्कर देत आपले टारगेट पूर्ण करून भारताचा इतिहासात आणखी एक कामगिरी करून गोल्ड मेडल जिंकले. भारताचा नीरज चोप्रा जिंकणार हा विश्वास सगळ्यांनाच होता. त्याने हे गोल्ड मेडल जिंकून पुन्हा एकदा सगळ्यांनाचा विश्वास जिंकला आहे. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल २०२३ (World Athletics Championship Final) मध्ये नीरज चोप्रा याने गोल्ड मेडल जिंकले आहे. दिवस रात्र मेहनत करून त्याने हे गोल्ड मेडल जिंकले आहे. हे मेडल जिंकल्यानंतर निरजने सर्व देशवासीयांचे आभार मानले आणि एक खास संदेश दिला.

नीरज म्हणाला, ” मी स्वत:ला पूश केलं, स्पीडमध्ये माझं १०० टक्के देत होतो तसं नसतं झालं तर त्याची उणीव जाणवली असती. मी सर्व देशवासियांचे आभार मानतो की तुम्ही सगळे रात्रभर जागे राहिलात आणि मला सपोर्ट केलंत. सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मेहनत करा आणि संपूर्ण जगात आपल्या देशाचं नाव करा.” असा संदेश देशवासियांना दिला आहे.

वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल २०२३ मध्ये भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम हे दोघं भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये होते. नीरज ने पाहिला भाला फेकल्यानंतर तो फाऊल गेला आणि त्याने दुसऱ्यानंदा भाला ८८.१७ मीटर फेकला. तर अर्शदने ८७.८२ मीटर पर्यंत भाला फेकला. पण नीरजचा पुढे कोणलाही जात आलं नाही. या स्पर्धेत अरशद नदीम याला रोप्य पदक मिळाले तर जैकोब वाडले याला कांस्यपदक मिळाले आहे. जैकोब वाडले याने ८६. ६७ मीटर पर्यंत भाला फेकला होता. याआधी नीरज चोप्राने २०१६ मध्ये ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकून भारताचे नाव उंचावले होते. त्यावेळी अ‍ॅथलेटिक्समध्ये( Athletics) कामगिरी करणारा पहिला भारतीय होता. त्यानंतर २०२३ मध्ये नीरज चोप्राने सिनिअर लेवलला वर्ल्ड चॅम्पियनशीप (World Championship at senior level) जिंकली आहे.

हे ही वाचा:

राशिभविष्य २८ ऑगस्ट २०२३, आजच्या दिवशी तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.

यंदा Raksha Bandhan निम्मित बनवा स्वादिष्ट काजूचा हलवा

तब्बल १७ वर्षानंतर बिग बी आणि किंग खान झळकणार एकत्र
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss