Thursday, April 25, 2024

Latest Posts

अदानी सोबतच नीता अंबानींनी देखील पीडितांना दिला मदतीचा हात

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. एकापाठोपाठ तीन गाड्यांची धडक होऊन 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. एकापाठोपाठ तीन गाड्यांची धडक होऊन 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले. देशात तब्बल 30 वर्षांनंतर हा सर्वात मोठा आणि भीषण रेल्वे अपघात आहे. या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे.याशिवाय अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे.

आता मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी, नीता अंबानींचे रिलायन्स फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत हँडलने ट्विट केले की ते बाधितांच्या उपचारांना मदत करेल आणि त्यांची आयुष्य पुर्ववत करण्यास मदत करेल. फाउंडेशनने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, या दुःखाच्या प्रसंगी आम्ही पीडितांच्या पाठीशी उभे आहोत.ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करतो.रिलायन्स फाऊंडेशनने ट्विटर हँडलवर सांगितले की, आम्ही या अपघातात बळी पडलेल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहोत.

रिलायन्स फाऊंडेशन पीडितांच्या उपचारासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. दुसरीकडे, रिलायन्स फाऊंडेशनची टीम ऑन ड्युटी अधिकाऱ्यांना मदत करण्यात तसेच बचाव कार्यात गुंतलेली आहे. देशातील श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी रविवारी ट्विट केले की, अदानी फाऊंडेशन रेल्वे अपघातात त्यांचे पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करेल. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ओडिशातील रेल्वे दुर्घटना अत्यंत अस्वस्थ करणारी असल्याचे म्हटले आहे. अदानी समूहाने सांगितले की, पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आणि मुलांना चांगले भविष्य देणे ही त्यांची संयुक्त जबाबदारी आहे. त्यांनी ट्विट केले की, ओडिशा रेल्वे अपघातामुळे सर्वांनाच दु:ख झाले आहे.

हे ही वाचा : 

अंबादास दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारला विचारले सवाल

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बच्चू कडूंची आगळीवेगळी प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss