Thursday, April 25, 2024

Latest Posts

Amit Shah यांनी घेतली कुस्तीपटूंची भेट, कुस्तीपटूंचा संघर्ष आता संपणार का?

कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लावलेले आरोपांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय महिला कुस्तीपटूंनी केली आहे.

कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लावलेले आरोपांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय महिला कुस्तीपटूंनी केली आहे. कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आपल्या मागण्यांवर ठाम आहेत असे चित्र सध्या दिसत आहेत. ३ जून रोजी भारतीय कुस्तीपटूंनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. कुस्तीपटू आणि अमित शाह यांच्याकडे जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. कुस्तीपटूंनी शनिवारी केंद्रीय बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची चौकशीची मागणी तर केली आहेच.

त्याचबरोबर बृजभूषण सिंह यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कुस्तीपटूंची ३ जून रोजी रात्री ११ वाजता भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांच्या बैठकीमध्ये साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या खेळाडूंचा समावेश होता. खाप पंचायतींनी केंद्र सरकारला ९ जूनपर्यंतचे अल्टिमेटम देण्यात आले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता चौकशी करण्याचे आश्वासन कुस्तीपटूंना देण्यात आले आहे.

याप्रकरणाच्या बाबतीत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या प्रकरणात पोलीस योग्य ती चौकशी करत आहेत, तसेच कायदा योग्य तो न्याय नक्की करेल असे आश्वासन अमित शाह यांनी कुस्तीपटूंना दिले आहे. जेव्हा कुस्तीपटूंनी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली तेव्हा अमित शाह म्हणाले की, घाईत कोणताही निर्णय न घेता समजुतीने निर्णय घ्यावेत असा सल्ला सुद्धा कुस्तीपटूंना देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss