Thursday, April 25, 2024

Latest Posts

Sameer Wankhede यांच्या अडचणीत वाढ, ३० मे रोजी कुटूंबियांची चौकशी

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोपांप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोपांप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांना येणाऱ्या ८ जूनपर्यंत हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. त्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांची तब्बल तासंतास चौकशी केली. आता सीबीआय समीर वानखेडे यांच्या कुटूंबियांची चौकशी करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. समीर वानखेडे यांच्या बहिणीची आणि त्यांच्या वडीलांची उद्या सीबीआय चौकशी करणार आहेत. दोघांची सीबीआय कार्यालयामध्ये चौकशी होणार आहे असे सांगण्यात आले आहे. आर्यन या या प्रकरणामुळे समीर वानखेडे सीबीआय चौकशीच्या भोवऱ्यात अडकले आहेत. समोर वानखेडे यांची दोन दिवस तब्बल पाच पेक्षा अधिक वेळ चौकशी सीबीआयकडून घेण्यात आली होती. आता सीबीआय त्याचा कुटूंबियांची जबाब नोंदवणार आहेत.

उद्या सकाळी १० वाजता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही सीबीआय कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नवे काय वळण येईल हे पाहणे महत्वाचे ठरेल. सीबीआयचे अधिकारी या प्रकरणामध्ये चांगलेच ऍक्शन मोड मध्ये आहेत. सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर एक पथकाने थेट समोर वानखेडे यांच्या मुंबईमधील घर गाठले आणि छापा ठाकला.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss