spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

…आणि पार्सल उघडल्यावर बघितला तर दिसले “हे”

आजच्या इंटरनेटच्या जगात ऑनलाईन शॉपिंगचं (Online Shopping) महत्त्व वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून, आवडते कपडे तसेच दागिन्यांपर्यंत सर्व काही आता ऑनलाईन शॉपिंग अॅप्सवर सहज उपलब्ध आहे.

आजच्या इंटरनेटच्या जगात ऑनलाईन शॉपिंगचं (Online Shopping) महत्त्व वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून, आवडते कपडे तसेच दागिन्यांपर्यंत सर्व काही आता ऑनलाईन शॉपिंग अॅप्सवर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा विविध शॉपिंग अॅप्सवरून (Shopping Apps) ऑर्डर करणे लोकांना सोयीचे ठरत आहे. यामुळे एकतर त्यांचा वेळ तर वाचतोच, याशिवाय लोकांना हव्या असलेल्या वस्तू थेट त्यांच्या घरी पोहोचवल्या जातात. मात्र याच ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून एक धक्कादायक प्रकार मेक्सिकोतील (Mexico) एका व्यक्तीसोबत घडल्याचं समोर आलं आहे.

मेक्सिकोतील गुआनाजुआटो येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने ऑनलाईन स्टोअरमधून स्मार्टफोन ऑर्डर केला होता. मात्र, त्याला याची जराही कल्पना नव्हती की स्मार्टफोनऐवजी असे काहीतरी त्याला दिले जाईल. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेव्हा त्या व्यक्तीचे पार्सल घरी आले तेव्हा त्याच्या आईने ते घेतले आणि स्वयंपाकघरातील टेबलवर ठेवले. त्या व्यक्तीने जेव्हा त्याचे पार्सल उघडले तेव्हा तो थक्क झाला. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून मागवलेल्या स्मार्टफोनऐवजी या व्यक्तीला चक्क ग्रेनेड बॉम्ब सापडला होता. ग्रेनेड पाहून त्या व्यक्तीचे हात-पाय थरथर कापू लागले. त्यानंतर त्यांनी तत्काळ बॉम्बशोधक पथकाला याची माहिती दिली. ग्रेनेड असल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथक त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्याच्या घराला पूर्णपणे वेढा घातला. यानंतर लष्कराने बॉम्ब निकामी केला. ग्रेनेड निकामी झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

परंतु हे ग्रेनेड नेमके कोणी पाठवले हे शोधण्याचा प्रयत्न मेक्सिकोचे पोलीस अधिकारी करत आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, गेल्या ६ वर्षात मेक्सिको पोलिसांनी गुआनाजुआटो शहरातून ६०० हून अधिक स्फोटक उपकरणे जप्त केली आहेत. या घटनेमुळे तेथील लोकांच्या मनात ऑनलाईन खरेदीबाबत भीती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा: 

जालन्यातील मराठा आंदोलनकांची राज ठाकरे आज घेणार भेट

स्टॅलिन यांच्या वादग्रस्त विधानावर अमित शाहांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss