Friday, December 1, 2023

Latest Posts

Ankita Walawalkar होतेय नेटकऱ्यांकडून ट्रोल, ‘ती’ चूक पडली महागात

'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) अर्थात अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते. अश्यातच आता आता अंकिता वालावलकर ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) अर्थात अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते. अश्यातच आता आता अंकिता वालावलकर ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिचं एक रील सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. तिच्या या ‘वास्तव’ रीलने नेटकरी मात्र दुखावले गेले आहेत. प्रचंड कौतुक करणाऱ्या अंकितावर आता नेटकऱ्यांनीच टीका केली आहे.

अंकिता वालावलकर हिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक ‘वास्तव’ असं म्हणत एक व्हिडीओ शेअर करुन हा सर्व किस्सा सांगितला. पण या रीलचं कौतुक करण्यापेक्षा नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अंकिताला ट्रोल केलं. अंकिता व्हिडिओ मध्ये म्हणाली आहे की, एक शॉप सुरू केलं आहे. हे शॉप सांभाळण्यासाठी तिला एका होतकरू मुलीची गरज होती. शॉप सांभाळण्यासाठी एका मेहनती मुलीची गरज असल्याचं अंकिताने तिच्या एका मित्राला सांगितलं होतं. त्यानुसार मित्राने एका मुलीला नोकरीसाठी अंकितासोबत संपर्क करण्यास सांगितलं. अंकिताने संबंधित मुलीला दुकानात दररोज झाडू मारावा लागेल, दिवाबत्ती करावी लागेल असं सांगितलं होतं. त्यानंतर त्या मुलीने या नोकरीसाठी आपला स्पष्ट नकार कळवला.

त्यामुळे मुलीच्या अॅटिट्युडवर प्रश्न उपस्थित करणं अंकिताला चांगलच महागात पडलं आहे. अंकिता व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ एका टीकेला उत्तर देत थेट म्हणाली आहे की,”दहा हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या मुलीने सेल्फ रिस्पेक्टबद्दल बोलू नये”. अंकिताच्या या कमेंटनंतर तिला आणखी ट्रोल करण्यात आले. त्यानंतर स्पष्टीकरण देत अंकिता म्हणाली,”काही मुलींच्या अपेक्षा पाहून तयार केलेला हा व्हिडीओ आहे. अपेक्षांच्या नावाखाली घरी बसू नका. दुकानात झाडू मारल्याने आत्मसन्मान कमी होत नाही. मी कोणत्याही मुलीवर ही रील बनवलेली नाही. अशी कोणतीही मुलगी अस्तिस्वात नाही”. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरच्या व्हिडीओवर झाडू मारायचा होता तर त आवडीबद्दल का विचारलं? एखाद्याची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करू नकोस, आपण किती कमावतो यावर आपला सेल्फ रिस्पेक्ट ठरतो का? दहा हजारात जॉब करणाऱ्या मुलींना सेल्फ रिस्पेक्ट नसतो हे सांगणारी तू कोण? अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हे ही वाचा : 

धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss