Friday, December 1, 2023

Latest Posts

जबलपूरजवळ सैन्य दलाच्या गाडीला अपघात

सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी एक जवान गंभीर जखमी आहे.

जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या (Jabalpur Army Vehicle Accident) गाडीचा भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात सांगलीच्या (Sangli News) एका जवानाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी एक जवान गंभीर जखमी आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्याचा अगोदर पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली. पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या पोपट यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. मृत पोपट खोत यांची परिसरात गुणवत्तेची प्रशंसा होत असे. मात्र आता त्याच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या (Jabalpur Army Vehicle Accident) गाडीचा भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात सांगलीच्या (Sangli News) एका जवानाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी एक जवान गंभीर जखमी आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्याचा अगोदर पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली. पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या पोपट यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. मृत पोपट खोत यांची परिसरात गुणवत्तेची प्रशंसा होत असे. मात्र आता त्याच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

शशिकला भगवान मस्के या बीआरएसच्या सरपंचपदाच्या उमेदवार

तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss