spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

२०२५ ची बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरतंय खरी…

२०२५ सुरु होऊन फक्त १५ दिवस झालेत आणि जगभरात नवं नवीन घडामोडी घडत आहे. hmpv व्हायरस ने २०२५ मध्ये एन्ट्री घेतली. लॉस एन्जलिस मध्ये जंगलात लागलेली आग या दोन मोठ्या घटना अगदी २०२५ च्या पहिल्याच महिन्यात आणि १५ दिवसात घडल्या. बाबा वेंगानी आपल्या भविष्यवाणीत एक महामारी अशी येणार ज्यामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजणार असल्याचं लिहलं आणि तसंच काहीस कोरोना काळात घडलं देखील. आता बाबा वेंगाने २०२५ साठी देखील भविष्यवाणी केली आहे. पण या भविष्यवाणीने संपूर्ण जग हादरून गेलाय. काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि कस असेल हा वर्ष? बघुयात…

बाबा वेंगा यांना बाल्कन भागातील नास्त्रेदमस म्हटलं जातं. नास्त्रेदमस हे फ्रान्सचे ज्योतिषी होते. त्यांनी अनेक अचूक भविष्यवाणी केल्या होत्या. 1911मध्ये बाबा वेंगा यांचा जन्म झाला. त्यांचा खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा असे आहे. त्या महिला आहेत. 1996 मध्ये 86व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्या नेत्रहीन होत्या. त्यांच्याकडे भविष्य पाहण्याची एक विशेष शक्ती होती. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी सन 5079ची भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांनी सोव्हियत संघ विघटन, अमेरिकेत दहशतवादी संघटना अलकायदाचा 9/11चा हल्ला आदी भविष्याणी केल्या होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत.

2025 च्या सुरुवातीला चीनमधील HMPV विषाणूने जगाला धक्का दिला होता. हा विषाणू वेगाने पसरत आहे आणि एक नवीन आरोग्य समस्या बनत आहे आणि डॉक्टर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना COVID-19 महामारीची आठवण करून देणारी आहे आणि आता ती जागतिक चिंतेची बाब बनली आहे. त्याच वेळी, लॉस एंजेलिसमधील जंगलात लागलेल्या आगीने शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या आगीत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३० जण अजूनही बेपत्ता असून 12,000 हून अधिक इमारती जळून राख झाल्या आहेत तर १५५ चौरस किलोमीटरचा परिसर राख झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाणी ओतले गेले. पण तरीही खूप मोठ नुकसान या आगीने केलं.

बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये या दोन्ही घटनांचे नाव घेतले नसले तरी, त्यांनी 2025 मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि महामारीचा इशारा नक्कीच दिला आहे. त्याचे भाकीत अनेकदा अस्पष्ट असतात आणि ते स्पष्टीकरणावर अवलंबून असतात. त्यामुळे HMPV वायरस आणि ही लॉस एंजलसची आग त्यांच्या भविष्यवाणीमध्ये असू शकतात. 2025मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युरोपमधील युद्धामुळे संपूर्ण खंड नष्ट होऊ शकतो. हे युद्ध युरोपला संपूर्णपणे नष्ट करू शकते. या युद्धामुळे केवळ आर्थिक हानीच नाही, तर सामाजिक स्तरावरही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्याचा दीर्घकाळ परिणाम राहू शकतो. वेंगा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विजयाबद्दलही वक्तव्य केलेले आहे. सर्व काही बर्फासारखे वितळून जाईल, फक्त एकच अपवाद असेल, व्लादिमीरचा गौरव, रशियाचा गौरव, या युद्धामुळे जागतिक पातळीवर सर्वनाश होण्याची शक्यता आहे.

या संघर्षामुळे महाद्विपमधील लोकसंख्या कमी होणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 2025मध्ये एक अशी भयानक घटना होणार आहे, ही घटना मानव जातीच्या अंताचं कारण बनणार आहे, अशी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आहे. यूरोपमध्ये सुरू होणारा संघर्ष हा मानवजातीच्या विनाशाची सुरुवात असेल. हा संघर्ष अधिक पेटणार असल्याची बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आहे. 5079 मध्ये पृथ्वीवरून मानवजाती नष्ट होणार असल्याचं भाकीतही बाबा वेंगा यांनी केलं आहे.

बाबा वेंगा यांची एक आणखी भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2043 मध्ये युरोपमध्ये मुस्लिम प्रशासन असेल. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, त्या काळात भू-राजनीतिक बदल देखील पाहायला मिळू शकतात. 2076 पर्यंत संपूर्ण जगात कम्युनिस्ट प्रशासनाच्या पुनरागमनाची शक्यता असेल, असे ही बाबा वेंगा यांनी सांगितले आहे.

बाबा वेंगा यांनी 2025 संदर्भात आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे, ती म्हणजे याचवर्षी कँन्सर सारख्या दुर्धर आजारावर औषध शोधण्यात वैज्ञानिकांना यश येईल, यामुळे कँन्सरसारखा आजार सहजपणे बरा होऊ शकेल असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

मानवाला सुरुवातीपासूनच दुसऱ्या जगाबद्दल मोठं कुतुहल आहे. ऐलियन्सबद्द देखील शोध सुरू आहे ऐलियन्ससंदर्भातील संशोधनात मानवाला मोठं यश मिळेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांनी असंही म्हटलं आहे, की 2025 मध्ये अशा अनेक अप्रिय घटना घडू शकतात, जी जगाच्या अंताची सुरुवात असू शकते.

बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाणी केलेल्या आहेत, ज्या आत्तापर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत. स्टॅलिनची मृत्यू, सोविएत संघाचे विभाजन, दुसरे महायुद्ध किंवा 2004 मधील त्सुनामीसह अनेक घटना बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार घडलेल्या आहेत.तसेच स्वतःच्या मृत्यूची ही भविष्यवाणी केली होती. त्यांच्या निधनापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्यांचे निधन 11 ऑगस्ट 1996 रोजी होईल, आणि अगदी त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. असं सांगितले जाते की, आजही त्यांची भविष्यवाणी खरी ठरते. त्यांनी भविष्यवाणी २०२५ साठी कधी केली हे नक्कीपणे सांगणे कठीण आहे, कारण त्यांची भविष्यवाणी अनेक गोष्टींचा समावेश करतात आणि त्या सामान्यतः २००० च्या दशकांच्या सुरुवातीला केल्या होत्या. वेंगा यांच्या भविष्यवाणींमध्ये प्रामुख्याने नैतिक, भौतिक, आणि सामाजिक बदल यांचा उल्लेख होता.

त्याचे जवळजवळ सगळेच भाकित खरे ठरले आहेत. परंतु त्याचे समीक्षक या गोष्टींना केवळ योगायोग किंवा मूर्खपणा मानतात. पण असं असल तरीही त्याचे रहस्यमय अंदाज लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय आहेत.

हे ही वाचा : 

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली…

अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss