Bank Holiday in March: फेब्रुवारी महिन्यातील आजचा शेवटचा दिवस. मार्च महिन्यात शाळांच्या सुट्ट्यांपासून बॅकेच्या अनेक नियमात बदल होतात. प्रत्येक महिन्यात बॅंकांना सुट्टी असते. दरम्यान १ मार्चला बॅंकांना सुट्ट्या असणार की नाही? संपूर्ण मार्च महिन्यात किती सुट्ट्या असणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. प्रत्येक राज्यांची सुट्टी ही त्या राज्यातील सणांनुसार वेगळी असते. त्यामुळे तुम्ही आरबीआयच्या वेबसाइटवर गेलात तर तुमच्या राज्यात कोणती सुट्टी आहे, अथवा नाही? हे तुमच्या लक्षात येईल. यावर्षी मार्च महिन्यात एकूण तब्ब्ल १४ दिवस बॅंक बंद राहणार आहेत. यामध्ये ५ रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त ७ दिवस बॅंकांचे कामकाज बंद राहीलं. १४ मार्चला होळी आणि ३१ मार्चला ईद यांसारखे २ मोठे सण आहेत.यादिवशी बॅंका बंद राहतील.
यावेळी आरबीआयने (RBI) ३१ मार्च हा दिवस बँक क्लोजिंगचा दिवस म्हणून घोषित केलाय. त्यामुळे या दिवशी बँका बंद राहणार नाहीत. असे असले तरी मिझोरम आणि हिमाचल प्रदेश वगळता सर्व राज्यांमध्ये ईदच्या दिवशी बँका सामान्यतः बंद असतात. असे असताना जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल. तर तुम्ही या सुट्ट्या वगळता बँकेत जाऊ शकता. मार्च महिन्यात तुमच्या राज्यात आणि शहरात बँका कधी बंद राहतील हे तुम्हाला RBI च्या वेबसाईट वर समजेल.
बॅंका बंद असल्या तरी तुम्ही तुमचे काम ऑनलाइन बँकिंगद्वारे पूर्ण करू शकता. बँका बंद असूनही तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा एटीएमद्वारे (ATM) पैशाचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे करू शकता. बँक सुट्ट्यांमुळे या सुविधांवर परिणाम होणार नाही. १ मार्चला रविवार नाहीय किंवा कोणता सणही नाहीय. त्यादिवशी शनिवार आहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी बॅंक सुरु असते. त्यामुळे १ मार्च २०२५ रोजी बॅंक खुल्या राहतील. या दिवशी बॅंकांमध्ये नेहमीचे काम सुरु राहीलं.
हे ही वाचा:
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन
Follow Us