Friday, June 2, 2023

Latest Posts

Bank Holidays in June 2023, २००० रुपयांच्या नोटा बदलायच्या? तर यंदाच्या वर्षी जून महिन्यात तब्बल १२ दिवस बँका राहणार बंद!

मे महिना संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. जून महिना हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

मे महिना संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. जून महिना हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा महिना चालू होण्यापूर्वी या महिन्यात नेमक्या किती दिवस बँका या बंद असणारा आहेत हे जाणून घेणं खूप जास्त महत्वाचे असते. त्यातच आता केंद्र सरकारने २००० रुपयांच्या नोटा बदलण्यास सांगितल्या आहेत त्यामुळे बँकामध्ये देखील मोठ्या प्रमाण गर्दी ही होत आहे. त्यामुळे जून महिन्यात बँका या किती दिवस आणि कधी बंद राहणार आहेत ते सविस्तर जाणून घ्या.

तसेच संपूर्ण जून महिन्यात बॅंका या तब्ब्ल १२ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार जून महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.

सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in June 2023)

४ जून २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१० जून २०२३ : महिन्याचा दुसरा शनिवार
११ जून २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१५ जून २०२३ : मिझोराम आणि ओडिशामध्ये राजा संक्रांतीनिमित्त बँका बंद राहतील.
१८ जून २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२० जून २०२३ : ओडिशात रथयात्रेमुळे बँका बंद राहतील.
२४ जून २०२३ : महिन्याचा चौथा शनिवार
२५ जून २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२६ जून २०२३ : त्रिपुरामध्ये खार्ची पूजेमुळे बँका बंद राहतील.
२७ जून २०२३ : केरळ, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये ईद उल अजहानिमित्त बँका बंद राहतील.
२९ जून २०२३ : ईद उल अजहा निमित्त इतर राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
३० जून २०२३ : मिझोराम, ओडिशामध्ये रीमा ईद उल अझा बँका बंद राहतील.

लोकांना बँकेशी संबंधित कामात कोणतीही अडचण येणार नाही कारण सुट्या वारंवार येत नाहीत किंवा कमी अंतराने येतात; एटीएम, रोख ठेवी, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सुरू राहतील. या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात कारण स्थानिक सण लक्षात घेऊन सुट्ट्या ठरवल्या जातात. तसेच बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग (Internet Banking), मोबाईल बँकिंगमुळे (Mobile Banking) लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास (Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss