Thursday, November 30, 2023

Latest Posts

Bank Holidays in November 2023, नोव्हेंबर महिन्यात तब्बल १५ दिवस बँका असणार बंद

Bank Holidays in November 2023, नोव्हेंबर महिन्यात तब्बल १५ दिवस बँका असणार बंद

लवकरच ऑकटोबरच महिना संपेल आणि नोव्हेंबर महिना चालू होईल. जर बँकांसंबंधी काही कामे तुम्ही नोव्हेंबर महिन्यात करणार असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी. नोव्हेंबर महिन्यातील अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल १५ दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात जर तुम्ही बँकेसंबंधित काही काम करणार असाल तर त्याआधी बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक (Bank Holiday List) एकदा नक्की पाहून घ्या.

नोव्हेंबर महिन्यामध्ये एकूण १५ दिवस बँकांना सुट्ट्या

नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसह अनेक सण-उत्सव असल्याकारणाने बँकांना सुट्टी असणार आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण नऊ सुट्ट्या आहेत. त्यासोबत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना असणारी सुट्टी आणि रविवारची सुट्टी यांचा समावेश केल्यास नोव्हेंबर महिन्यात १५ दिवस म्हणजेच तब्ब्ल अर्धा महिना सुट्ट्या आहेत.

नोव्हेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी-

१ नोव्हेंबर : हा दिवस करवा चौथ आणि कन्नड राज्योत्सव आहे. या दिवशी कर्नाटक, मणिपूर आणि हिमाचल या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
५ नोव्हेंबर या दिवशी रविवार असल्याने या दिवशी बँका बंद राहतील.
१० नोव्हेंबर : मेघालयमध्ये या दिवशी वंगाळा सणानिमित्त बँका बंद राहतील.
११ नोव्हेंबर या दिवशी महिन्याचा दुसरा शनिवार आणि १२ नोव्हेंबर या दिवशी रविवार असल्याने या दिवशी बँका बंद राहतील.
१३ नोव्हेंबर : या दिवशी दिवाळी आणि गोवर्धन पूजा असल्याने बँकांना सुट्टी असेल. त्रिपुरा, सिक्कीम, उत्तराखंड, मणिपूर,उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
१४ नोव्हेंबर : या दिवशी बली प्रतिपदा आहे. या दिवशी, सिक्कीम, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रात बँकांना सुट्टी असते.
१५ नोव्हेंबर : या दिवशी भाऊबीज आहे तसेच चित्रगुप्त जयंतीमुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मणिपूर,आणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
१९नोव्हेंबर ला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.

२०नोव्हेंबर : छठ पूजा असल्याने बिहारसह राजस्थानमध्ये बँकांना सुट्टी असेल.
२३ नोव्हेंबर : सेंग कुत्स्नेम आणि इगास बागवाल यांचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये सुट्टी असेल.

२५ नोव्हेंबर या दिवशी चौथा शनिवार आणि २६ नोव्हेंबर या दिवशी रविवार असल्याने बँकांना या दिवशी सुट्टी असेल.
२७ नोव्हेंबर : गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. त्रिपुरा, मिझोराम,पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तेलंगणा,मध्य प्रदेश,चंदीगड, ओडिशा, उत्तराखंड, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, झारखंड,बिहारआणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी सुट्टी असेल.
३० नोव्हेंबर : कनकदास जयंती असल्याने कर्नाटकात या दिवशी बँका बंद राहतील

हे ही वाचा : 

Smriti Irani Malvani Laguage: ‘माका पिठी-भात आवडता’

जरांगे पाटलांच्या निर्धाराने शिंदे फडणवीस सरकारसमोर आव्हान!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss