Tuesday, April 16, 2024

Latest Posts

बापरे! Whatsapp असुरक्षित? एलॉन मस्क

ट्विटरमध्ये (Twitter) काम करणाऱ्या एका इंजिनिअरनं (engineer) स्वतःच्या मोबाईलवरुन एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला होता. अँप ऍक्टिव्ह नसतानाही व्हाट्सअप कथितपणे डिव्‍हाइसचे मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मागत असल्याचं त्याला दिसून आले.

ट्विटरमध्ये (Twitter) काम करणाऱ्या एका इंजिनिअरनं (engineer) स्वतःच्या मोबाईलवरुन एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला होता. अँप ऍक्टिव्ह नसतानाही व्हाट्सअप कथितपणे डिव्‍हाइसचे मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मागत असल्याचं त्याला दिसून आले. त्या इंजिनिअरने शेयर केलेल्या स्क्रिनशॉर्टनंतर एकच खळबळ माजली आहे. इंजिनिअर फोड डबिरी यांनी स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे आणि त्यांनीच हा दावा केला आहे. जेव्हा ते झोपले होते त्यावेळी त्यांच्या मोबाईलमधील व्हाट्सअप अप्लिकेशन ऍक्टिव्ह नसतानाही मायक्रोफोनचा उपयोग करत होते.

त्यानंतर ट्विटर इंजिनिअरने एलिया दाव्यानंतर व्हाट्सअपवर विश्वास ठेवता येणार नाही असे ट्विट एलॉन मस्क (Elon Musk) यांनी केले आहे. त्यावेळी तो इंजिनिअर झोपेत असताना व्हाट्सअप बॅकग्राउंडमध्ये मायक्रोफोनचा वापर करत होता. यावर ट्विटरचे इंजिनिअर फोड डबिरी यांचे म्हणणे आहे की, व्हाट्सअप मायक्रोफोनचा वापर करत आहे. त्यांनी Android डॅशबोर्डचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे.

त्या स्क्रिनशॉर्टवरुन असे दिसत आहे की, व्हाट्सअप पहाटे ४.२० वाजल्यापासून ते सकाळी ६.५३ वाजेपर्यत बँकग्राउंडमध्ये त्यांच्या मायक्रोफोनचा एक्सेस करत होते. डाबिरी यांच्याकडे गुगलचा पिक्सल 7 प्रो हा स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोन मध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप्स चालत नाहीत. ते रात्री झोपले असतानाही व्हाट्सअप त्यांच्या फोनचा मायक्रोफोन वापरत होता. हा प्रकार एखाद्या बगमुळे झाला असावा. आम्ही यासंदर्भात माहिती घेत आहोत, व्हाट्सअप असं म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss