Tuesday, April 23, 2024

Latest Posts

सावधान! तुम्हालाही WhatsApp वर येतायत +84 +62 +60 या नंबर्सवरून कॉल्स? गंडा घालण्याआधीच व्हा सावध

सध्याच्या डिजिटल (Digital) दुनियेत आपण अनेक स्कॅम (scam) बद्दल ऐकून असतो. मोबाइलची संख्या वाढल्यामुळे मोबाइलवर अनेक स्कॅम होतात. दिवसभरातून आपल्याला रोजतरी ४ ५ फेक कॉल्स येत असतात.

सध्याच्या डिजिटल (Digital) दुनियेत आपण अनेक स्कॅम (scam) बद्दल ऐकून असतो. मोबाइलची संख्या वाढल्यामुळे मोबाइलवर अनेक स्कॅम होतात. दिवसभरातून आपल्याला रोजतरी ४ ५ फेक कॉल्स येत असतात. चोरट्यांची नवीन टेकनिक म्हणजे लोकांकडून ओटीपी (Otp) घेऊन लोकांच्या अकाऊंट मधले सगळे पैसे लंपास करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. पण हल्लीच एक नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. या नव्या घोटाल्याव्दारे लोकांना अडकवले जात आहेत. तर जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण.

तुमहाला +84 +62 +60 या आंतरराष्ट्रीय नंबर्स वरून कॉल्स येत असतील तर ते अजिबात उचलू नका आणि त्वरित त्या नंबर ला ब्लॉक करून टाका. चोरटे लोकांकडून पैसे लंपास करण्यासाठी नवीन नवीन टेकनिक शोधत आहेत. सध्याच्या या डिजिटल दुनियेत त्यांनी व्हाट्सअँप (WhatsApp) च्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचा नवीन मार्ग स्वीकारला आहे. आजकाल घराघरात व्हाट्सअँप वापरला जातो. व्हाट्सअँप न वापरणारे लोक आपल्याला कमीच बघायला मिळतात. त्यामुळे लोकांना फसविण्यासाठी चोरटयांना हा मार्ग सोप्पा आणि सोयीस्कर वाटत आहेत. व्हाट्सअँप वरील घोटाळे हे अनेकदा उघडकीस आले आहे. व्हाट्सअँप हे एक संदेश पाठवण्याचे माध्यम असून घोटाळेबाज त्याचा वापर वाईट काम करण्यासाठी वापरतात. माहितीनुसार व्हाट्सअँप या App चे जवळजवळ दोन अब्ज ऍक्टिव्ह युजर्स (active users) आहेत.

व्हाट्सअँप हे एक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय उपयुक्त माध्यम आहे. परंतु घोटाळेबाज याचा वापर चुकीच्या पद्धतीने करून लोकांना फसवतात. व्हॉट्सअँप युजर्स नि तक्रार केली आहे कि त्यांना आंतरराष्टीय नंबर्स वरून कॉल्स येत आहेत. आणि हे नंबर्स मलेशिया (Malaysia),केनिया (Kenya), इथोपिया (Ethiopia) आणि व्हिएतनाम (Vietnam) या देशांचे आहेत. पण अजूनही हे कॉल्स कशासाठी येत आहेत हे अजूनही उघडकीस आलेले नाही. काही लोकांचे असे म्हणणे आहे कि हा प्रकार एका नव्या scam चा भाग आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल्स हे जास्तीतजास्त अश्या लोकांना येत आहेत ज्यांनी नवीन सिम कार्ड घेतलं आहे.

तुम्हालाही जर असे कॉल्स येत असतील तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. सर्वप्रथम तुम्ही ज्या नंबर वरून कॉल आला आहे त्या नंबर ला व्हॉट्सअँप वरून रिपोर्ट आणि ब्लॉक करा. तुमहाला त्या नंबर वरून काही लिंक किंवा कसलाही व्हिडीओ आला असेल तर तुम्ही तो ओपन करू नका. कारण त्या लिंक वर जर तुम्ही क्लिक केले तर तुमचा डेटा किंवा तुमचे पैसे चोरण्याचा कोणताहि मॅलवेयर (Malware) असू शकतो. तुम्हाला लुबाडण्यासाठी व्हॉट्सअँप कॉल च्या साहाय्याने तुम्ही फसवणूक केली जाऊ शकते. म्हणूनच तुम्ही वेळीच सावध रहा.

हे ही वाचा : 

RCBvsMI, विराट कोहली आणि रोहित शर्मा आमनेसामने, कोण मारणार बाजी

गंगाराम गवाणकर यांना ‘मानाचि’चा ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ प्रदान

CSKvsDC, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स, कोण मारणार बाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss