राजधानी दिल्ली (Delhi) त वाढलेल्या प्रदूषणामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, दिल्लीतील प्रदूषण (Delhi Pollution) कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर बांधकामांना बंदी (Construction), शाळांना सुट्टी रस्त्यावर सम-विषम प्रमाणे वाहनांना () परवानगी अशा मोठ्या निर्णयांचा समावेश आहे. येत्या १३ ते २०नोव्हेंबरपर्यंत ऑड-इव्हन अर्थात सम विषम नियम (Odd-Even Scheme) लागू होईल. याशिवाय कोणत्याही बांधकांमांना परवानगी नाही. तसंच ११ वी पर्यंतच्या शाळांना १०नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल. इतकंच नाही तर BS-3 पेट्रोल आणि BS-4 डिझेल कारवर पूर्णपणे बंदी असेल.
दिल्लीमध्ये शाळांना सुट्टी
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शाळांना ही सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये दहावी आणि बारावी वगळता इतर वर्गांना सुट्टी देण्यात आली आहे. इतर इयत्तांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच दिल्लीमध्ये BS-3 आणि BS-4 डीझेल गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम
दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाचा नवा रेकॉर्ड बनला आहे. प्रदूषणामुळे दिल्लीचे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही केल्या वाढत्या प्रदूषणापासून सुटका मिळताना दिसत नाही. सरकारही सर्व प्रकारचे प्रयत्न करताना दिसत आहे, मात्र प्रदूषणाची पातळी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता दिल्ली सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम आदेश देण्यात आला आहे. सोमवारपासून सरकारी आणि खासगी कंपन्यांचे फक्त टक्के कर्मचारी त्यांच्या कार्यालयात येतील, असा आदेश सरकारने जारी केला आहे.
डिझेल वाहनांवर बंदी
दिल्लीतील हवा दिवसेंदिवस विषारी होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये प्रदूणषाची समस्या गंभीर झाली आहे. दिल्लीतील प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली आहे. यामुळे, कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने ५ नोव्हेंबरपासून ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GREP) चा टप्पा ४ लागू केला. यामुळे आता दिल्लीत डिझेल वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
नागरिकांना श्वास घेण्यासही अडथळे
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी सांगितलं की, दिल्लीतील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. ३० ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली आहे. दिल्लीत एकीकडे थंडी वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे हवेतील प्रदूषणही वाढ आहे. हवेतील धूलीकणांमुळे नागरिकांना श्वास घेण्यासही अडथळे निर्माण होत आहेत. वाढलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांचा आरोग्यावरही वाईट परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन विविध उपाययोजना करताना दिसत आहे.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.