त्रिपुरा (Tripura) पोलिसांनी रविवारी (12 नोव्हेंबर) रोजी 14 जणांना अटक केली. त्रिपुरा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात प्रवेश करत होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आसाम आणि त्रिपुरामध्ये मानवी तस्करी आणि घुसखोरी विरोधात देशव्यापी छापे टाकून किमान 25 जणांना अटक केली होती.
त्रिपुराच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण त्रिपुरातील साब्रुम या सीमावर्ती शहरातील एका घरातून चार महिला आणि चार मुलांसह 14 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. बांगलादेशी नागरिकांनी शनिवारी दक्षिण त्रिपुरामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि सबरूम उपविभागातील वैष्णवपूर गावात एका भारतीय नागरिकाच्या घरी मुक्काम केला.
नोकरीच्या शोधात बंगळूरला जाण्याचा प्रयत्न
बांगलादेशींनी पोलिसांना सांगितले की ते नोकरीच्या शोधात बेंगळुरूला जाण्याच्या प्रयत्नात होते. यावर पोलिसांनी सांगितले की, आम्ही अटक केलेल्या बांगलादेशींच्या दाव्याची चौकशी करत आहोत
वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वर्षात आणि गेल्या वर्षी त्रिपुरा आणि आसाममधून मोठ्या संख्येने बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अटक करण्यात आली होती. घुसखोरांच्या चौकशीदरम्यान असे आढळून आले की त्यांनी गुप्त मार्गांनी अवैध स्थलांतरितांना भारतात प्रवेश करण्यास मदत केली. भारतीय दलाल आणि मध्यस्थ मानवी तस्करीत मोठी भूमिका बजावत आहेत. भारत-बांगलादेश सीमेच्या दोन्ही बाजूंनाच नव्हे तर देशाच्या मुख्य भूभागावरही दलाल उपस्थित असल्याचेही तपासादरम्यान उघडकीस आले आहे.
बांगलादेशी आणि रोहिंग्या बेकायदेशीरपणे कुंपण नसलेल्या आणि खुल्या भारत-बांग्लादेश सीमेवरून भारतात प्रवेश करतात.
हे ही वाचा :
दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला
दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.