सध्याच्या काळात सर्वत्र सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक होताना आपण पाहू शकतो. सोशल मीडियाचा वापर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत होताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्म आहेत, अनेक अँप्स आहेत जे अनेक लोक त्याचा वापर करतात. सध्या सोशल मीडियावरती एक नवीन प्लॅटफॉर्म ब्लूस्कायकडे अनेक लाखो लोकांचे आकर्षण वाढले आहे, तसेच लाखो युजर्स हे अकाऊंट बनवत आहेत. यामध्ये बहुतांश एक्स म्हणजेच ट्विटर युजर्सचा समावेशही आहे. तर जाणून घेऊया या नवीन प्लॅटफॉर्मची नवीन खासियत आणि नवीन प्लॅटफॉर्मला युजर्स का पसंती देतात.
लाखो लोकांमध्ये लोकप्रिय असलेले मायक्रो ब्लॉगिंग साईड एक्स (ट्विटर) चा लाखो युजर्सनी निरोप घेतला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर इलॉन मस्कच्या एक्सला सोडून युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Bluesky) ब्लूस्काय कडे वळताना दिसत आहे. दहा लाखांपेक्षा जास्त युजर्सनी डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणुकीच्या विजयानंतर ब्लूस्काय जॉईन केल आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन निवडणुकीमधील इलॉन मस्कच्या सहभागामुळे अनेक युजर्स ब्लूस्कायचा मार्ग स्वीकारत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना इलॉन मस्क यांनी अधिकृतपणे पाठिंबा दर्शवला होता तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात देखील ते सक्रिय होते. तसेच एक महत्त्वाचे कारण म्हणजे एक्सनं याआधी घोषणा केली होती की युजर्स आता त्या लोकांचे पोस्ट देखील पाहू शकतात, ज्या लोकांनी त्यांना ब्लॉक केलं आहे.
या कारणामुळे ब्लूस्कायला बारा लाख नवीन युजर्स मिळाले आहेत. जेव्हा सप्टेंबरमध्ये ब्राझीलनं एक्सवर बंदी घातली होती त्यावेळी देखील ब्लूस्कायच्या युजर्समध्ये तीस लाख युजर्सची वाढही झाली होती. सध्या ब्लूस्काय युजर्सची संख्या वाढत गेली आहे. आता ब्लूस्कायवर एकूण एक कोटी पन्नास लाख युजर्स झाले आहेत. जे युजर्स सप्टेंबरमध्ये नव्वद लाख होते. ब्लूस्काय प्लॅटफॉर्मवरती नवीन युजर्समध्ये उत्तर अमेरिका आणि युनायटेड किंगडममधल्या युजर्सचंगी संख्या सर्वाधिक आहे.
एलोन मस्क यांच्या एक्स (ट्विटर) प्रमाणेच ब्लूस्काय एक सोशल प्लॅटफॉर्म आहे. ट्विटर प्रमाणेच तुम्ही ब्लूस्कायवर मेसेज, पोस्ट, आणि रिप्लाय सारख्या गोष्टी करू शकता. हे एक विकेंद्रित (डिसेंट्रलाइज) सोशल नेटवर्क आहे आणि याला ट्विटरकडूनच फंडिंग मिळाली होती. तसेच २०१९ मध्ये तत्कालीन सीईओ आणि को-फउंडर जॅक डोर्सी यांनी याची घोषणा केली होती. यानंतर २०२१ मध्ये ब्लूस्काय एक स्वतंत्र कंपनी म्हणून लॉंच करण्यात आली आणि २०२३ मध्ये बीटा व्हर्जन लोकांसाठी उपलब्ध झालं. हे प्लॅटफॉर्म मुख्य कार्यकारी अधिकारी जय ग्राबर यांच्या मालिकाच आहे.
ब्लूस्कायची वैशिष्ट्ये
ब्लूस्कायचे युजर्स हे त्यांचे स्वतःचे सर्व्हर निर्माण करू शकतात आणि तिथे डेटा साठवून ठेवू शकतात, यासाठी कंपनीच्या सर्व्हरची गरज नाही. तसेच ब्लूस्काय युजर्स हे स्वतःचे नियम स्वतः ठरवू शकतात. या प्लॅटफॉर्म वरती युजर्स इथे इतरांना ब्लॉक करू शकतात. या उलट एक्सवर ब्लॉक केल्यावर देखील युजर्स आपल्या सार्वजानिक पोस्ट सहज पाहू शकतात.
हे ही वाचा:
५० खोकेवाल्या गद्दारांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा व भाजपाचाही सुपडासाफ, मल्लिकार्जुन खर्गे
मोठी बातमी:अबू आझमीला आला हृदयविकाराचा झटका; प्रकुर्ती नाजूक