Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Breaking, केंद्र सरकारकडून २ हजारांची नोटबंदी, नोटा रिझर्व्ह बँक परत घेणार

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच केंद्र सरकारने मोठा निर्णय हा दिला आहे. केंद्र सरकारकडून २ हजारांची नोटांवर बंदी केली आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय हा दिला आहे. केंद्र सरकारकडून २ हजारांची नोटांवर बंदी केली आहे. तसेच या २०० रुपयांच्या नोटा या रिझर्व्ह बँक परत घेणार आहेत. तसेच या २ हजाराच्या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतच बँकांमध्ये जमा करण्याची मुदत ही देण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटांबद्दल एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. २ हजाराच्या या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. परंतु या नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आहे असे देखील सांगितले जात आहे. कारण आरबीआयने (RBI) बाजारातून २००० रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या नोटा दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिक वापरू शकणार आहेत असं देखील आरबीआयने म्हटले आहेत. २०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई ही थांबवण्यात आली होती. नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी हा देण्यात आला आहे.

सध्या या नोटा व्यवहारात असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आता दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या नोटा परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ३० सप्टेंबपर्यंत २ हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या २००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून या २ हजाराच्या नोटा बंद होतील, अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. तसेच सोशल मीडियावर देखील या बाबत वारंवार चर्चा केल्या जात होत्या. पर्णातू आज अखेर रिझर्व्ह बँक ने या बाबत आदेश दिला आहे. तसेच या नोटा बदलत असताना एकावेळी फक्त २ हजार रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.

२००० हजाराच्या नोटा केव्हा चलनात आल्या ?

मोदी सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करून २००० हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. तसेच नोटाबंदीची घोषणा करताना सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss