spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

लाखो लेकीच्या शिक्षिका ‘क्रांती जोती सावित्रीबाई फुले’ यांच्या स्मृतिदिनानिमित्त थोडक्यात माहिती

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई जोतीराव फुले यांनी महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. अशा क्रांती जोती सावित्रीबाई फुले’ यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाणून घेऊयात थोडक्यात माहिती.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारीला झाला असून त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. विवाहाच्या वेळी सावित्रीबाई ९ वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. विवाहाच्यावेळी ज्योतिराव फुले यांचे वय १३ होते. सावित्रीबाई लग्नाच्या वेळी निरक्षर होत्या. त्यांच्या पतीने त्यांना आणि त्यांच्या चुलत बहिणीला, सगुणाबाई शिरसागर यांना त्यांच्या घरीच शिक्षण दिले. सावित्रीबाई यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ज्योतिराव फुले यांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचे शिक्षण पूर्ण केले.

सावित्रीबाईंबद्दल काही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील होत्या. त्या व्यतिरिक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हटलं जायचं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले. त्याचबरोबर त्यांचे पती जोतीराव फुले यांनी सावित्रीबाईंच्या प्रत्येक अडचणीत त्यांना साथ दिली. ज्योतिबा हे त्यांचे आदर्शस्थान होते.

सावित्रीबाईंनी काव्यप्रतिभेने ज्योतिबांना वंदन केले आहे :
“ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी… (ज्योतिबांना नमस्कार)’
‘माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।।
जैसा मकरंद। कळीतला… (संसाराची वाट)”

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss