Saturday, April 20, 2024

Latest Posts

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्तीपटूंनी अनेक आरोप लावले आहेत. त्याचबरोबर ते दीड महिन्यापासून जंतरमंतर आंदोलन करत आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्तीपटूंनी अनेक आरोप लावले आहेत. त्याचबरोबर ते दीड महिन्यापासून जंतरमंतर आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे ते त्यांचे पदक गंगेमध्ये विसर्जित करणार होते परंतु नंतर त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला. त्याचबरोबर आज कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी १९८३ मध्ये विश्वचषक जिंकलेल्या क्रिकेटपटूंनी केले आहे.

या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आज सलग दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्रमध्ये खाप महापंचायत (Khap Mahapanchayat) पार पडली. महापंचायत झाल्यानंतर शेतकरी नेते राकेश टीकेत यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे आणि त्यांनी मागणी केली आहे की, ९ जूनपर्यत ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली पाहिजे. त्यानंतर जे काही होईल त्याला सरकार जबाबदार असेल अशा इशाराही राकेश टीकेत यांनी दिला आहे.

पुढे राकेश टीकेत म्हणाले की, ९ जूननंतर जर ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा कुस्तीपटूंना जंतर मंतर वर सोडू आणि संपूर्ण देशभरामध्ये पंचायत आयोजित करू असे ते म्हणाले. पार पडलेल्या दोन्ही महापंचायतीमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमधील खप पंचायतीच्या प्रमुखांनी सहभाग घेतला आहे. महिला कुस्तीपटूंना न्याय न मिळाल्यास ९ जून पासून आम्ही आंदोलन आमच्या पद्धतीने सुरू करू असे ते म्हणाले आहे.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss