गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हवामान बदल झालेला दिसत आहे. राज्यासह देशातही एकीकडे हवेतील गारवा वाढलेला जाणवत आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र सह देशातल्या काही भागात पावसाची शक्यता यादरम्यान वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, ज्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रासह देशातील हवामानावर होताना दिसत आहे. (Western Disturbance) वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात पुढील थोडे दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने यासंदर्भात वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील काही भागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तामिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. गोव्यासह कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही सध्या जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यातल्या काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील काही ठिकाणी आकाश निरभ्र तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्यासोबतच जोरदार पाऊस पाहायला मिळेल.
प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ
देशात एकीकडे थंडीची चाहूल लागली आहे, पण त्याचबरोबर हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. धुके आणि धुलिकणांमुळे मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात अनेक शहरांत हवेची गुणवत्ता खराब झाल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुक्याची पांढरी चादर या शहरात पसरलेली पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अपडेटनुसार, मंगळवारी रात्री उशिरापासून जम्मू -काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उच्च उंचीच्या असलेल्या भागात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स (Western Disturbance) प्रवेश करेल. ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पावसासह बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचवेळी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडू शकतो.
हे ही वाचा :
आजचे राशिभविष्य, ०६ नोव्हेंबर २०२३,आजच्या दिवशी तुम्हाल उत्तेजित करणा-या
सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची देखील हवेची गुणवत्ता खालावली; निर्देशांक १६१ पार