Saturday, June 3, 2023

Latest Posts

मंत्रिपदाचे आमिष दाखवून २८ आमदारांची फसवणूक

एक भामट्या मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांची फसवणुक करत होता. त्या आरोपीने तब्बल २८ आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या सूत्र दलाकडून देण्यात आली आहे. या आरोपीचे नाव नीरज सिंह राठोड असे आहे.

एक भामट्या मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांची फसवणुक करत होता. त्या आरोपीने तब्बल २८ आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या सूत्र दलाकडून देण्यात आली आहे. या आरोपीचे नाव नीरज सिंह राठोड असे आहे. या आरोपीच्या सीडीआरमध्ये २८ आमदारांचे फोन नंबर आढळून आले आहेत. फोन केलेल्या २८ आमदारांपैकी ३ आमदारांनी त्याला पैसे देखील पाठवले होते अशी माहिती समोर आली आहे. त्या आरोपीच्या मोबाईलमध्ये फक्त महाराष्ट्राचेच नाही तर गोवा, नागालँड, पश्चिम बंगाल त्याचबरोबर झारखंड या राज्यांमधील काही आमदारांचे मोबाइल क्रमांक देखील मिळाले आहेत. एवढेच नाही तर आरोपी नीरज सिंह राठोड हा जे पी नड्डा यांचा आवाज काढून आमदारांची फसवणूक करत होता.

जे पी नड्डा यांच्या आवाज असल्यामुळे भाजपचे अनेक आमदारांना मंत्रिपदाची भुरळ पडली होती. फेब्रुवारी २०२३ पासून ते काल परवापर्यत हा आरोपी आमदारांची फसवणूक करत होता. अनेकांना निरज सिंह राठोड या नावाच्या व्यक्तीचे काल परवापर्यत फोन येत होते. प्रत्येक आमदाराला कॉल करून तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा सहायक आहे असे सांगत असे. एवढेच नाही तर महाराष्ट्रामधील भाजप आमदारांना तुमची निवड महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्यासाठी केली जात आहे असे तो आमदारांना सांगत असे त्याच बरोबर तुम्हाला कोणते मंत्रिपद हवे आहे याची देखील तो विचारणा करायचा. काही दिवसांपासून भाजपचे आमदार विकास कुंभारे याना ७ मे पासून सारखे या आरोपीचे फोन येत होते.

विकास कुंभारे यांना सुरुवातीला वाटले की खरंच आपल्याला राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयामधून कॉल येत आहे असे त्यांना वाटले होते. त्यांनतर मंत्रिपदाच्या मोबदल्यात पैशानी मागणी केल्यांनतर त्यांना शंका आहे आणि त्यांनी चौकशी केली असता हा त्यांना लुबाडण्याचा प्रकार सुरु आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर विकास कुंभारे यांनी नागपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत ही घडले होते अशी माहिती समोर आली. एक नव्हे र अशा अनेक आमदारांची फसवणूक सुरु आहे असे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनतर पोलिसांच्या लक्षात आले की हा आरोपी गुजरातमधील मोरबीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि नागपूर पोलिसांच्या पथकाने काल संध्याकाळी त्याला ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

Adipurush चित्रपटातील Jai Shri Ram गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

Time maharashtra exclusive : निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या स्किल्सवर अवलंबलेले, बघूया नेमकं काय म्हणाले Milind Patankar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss